Thursday, July 4, 2024
Homeनाशिकदेशदूत राजकीय विशेष : नाशिकच्या राजकारणात 'बुलडोझरबाबा'ची एन्ट्री

देशदूत राजकीय विशेष : नाशिकच्या राजकारणात ‘बुलडोझरबाबा’ची एन्ट्री

आगामी काळात आणखी जोमाने कारवाईचे संकेत

नाशिक | फारुख पठाण | Nashik

- Advertisement -

नाशिकच्या राजकारणात (Nashik Politcs) देखील आता बुलडोझरबाबाची एन्ट्री झाल्याचे शनिवारी मुंबईनाका (Mumbainaka) भागात झालेल्या कारवाईवरुन दिसत आहे. देशातील उत्तर प्रदेशमध्ये सर्वात पहिले मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी राजकारणात बुलडोझरची एन्ट्री करून घेतली आहे. तर त्यांच्या प्रचार सभांमध्ये देखील आता बुलडोझर सभेच्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणासह लोकांचे अतिक्रमण काढण्यासाठी बुलडोझरचा उपयोग करण्यात येत आहे तर आता त्याची एन्ट्री नाशिकच्या राजकारणात देखील झाली आहे.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी गोंधळ; शिवसेनेने घेतला आक्षेप

दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी (दि.२९) शहरातील मुंबई नाका भागात दिवसभर मोठा राडा पहायला मिळाला. त्या ठिकाणी असलेले माजी आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत गिते (Vasant Gite) यांच्या कार्यालयाचे अतिकमण काढण्यासाठी महापालिकेचा मोठा फौजफाटा तसेच प्रचंड पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी दाखल झाला होता. विद्यमान मध्य नाशिकच्या आ.देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी प्रशासनावर दबाव टाकून ही कारवाई करायला लावल्याचे गिते यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) मतदानाच्या दिवशी जुन्या नाशिक येथील भद्रकाली पोलीस ठाणे शजारील महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद शाळा मतदान केंद्रावर आ. फरांदे व माजी आ. वसंत गिते यांच्यात चांगलाच राडा झाला होता. दोघांनी एकमेकाला अरे, कारे केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.मतदान सुरू असताना आ.फरांदे त्या ठिकाणी आल्या व त्यांनी मतदान झालेल्यांना बाहेर काढा, अशी मागणी केली होती.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा गोंधळ

त्याचवेळी काही तरुणांनी (Youth) गोंधळ घालायला सुरुवात केली होती. तर त्वरित माजी महापौर विनायक पांडे व इतर नेते त्या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी आ. फरांदे यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हे सगळें घडत असताना दोन्ही बाजूचे समर्थक जमा झाले. त्यातच माजी आ. गिते देखील त्या ठिकाणी दाखल झाल्याने गिते व फरांदे समोरासमोर आल्यावर त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्याचा वचपा काढण्यासाठीच आ. फरांदे यांनी गिते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण कारवाई केल्याचे गिते समर्थकांचा आरोप आहे.

गितेंचे नाव पुढे

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आ. वसंत गिते यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देखील काही इच्छुक आहे, मात्र महाविकास आघाडी एक संघ लढली तर मध्य नाशिकची जागा शिवसेना ठाकरे गटाकडेच ठेवावी, अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेच्या गोंधळाची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल

आणखी यादी तयार

दरम्यान विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलडोझरची एन्ट्री झाल्यामुळे आता पुढे काय काय होत, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील जुने नाशिक परिसरात देखील आता अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार आहे. सारडा सर्कल ते दामोदर चित्रपटगृहापर्यंत यापूर्वीच सर्व्हे झाल्याची माहिती मिळाली असून त्यासह वडाळागाव परिसरात देखील कारवाई होणार असल्याचे समजते. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात देखील बुलडोझरबाबाची एन्ट्री झाल्याचे स्पष्ट होत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या