Saturday, September 21, 2024
Homeनाशिकउर्जामंत्र्यांनी मुंबईसारखेच शेती आणि उद्योगाकडेही लक्ष द्यावे : रायते

उर्जामंत्र्यांनी मुंबईसारखेच शेती आणि उद्योगाकडेही लक्ष द्यावे : रायते

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

मुंबईत (Mumbai) वीज (Electricity) खंडीत झाली तर ऊर्जा मंत्री तसेच संपूर्ण ऊर्जा विभाग कमाला लागला आणि वीज पुरवठा (Power supply) सुरळीत केला. दुसरीकडे मात्र जर कधी शेती (Agriculture) क्षेत्रात अशी वीज खंडीत झाली तर याची दखल यंत्रणा घेत नाही…

अशीच दखल शेतीबाबतही घेतली असती तर शेतकऱ्यांची (Farmers) नक्कीच प्रगती झाली असती. त्यामुळे शेतीप्रधान देश बिरुदावली लावणाऱ्या या देशात आणि महाराष्ट्रात याची दखल घेतली जाणार का? असा मुद्दा हायटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी खडक माळेगावचे अध्यक्ष योगेश रायते (Yogesh Rayate) यांनी उपस्थित केला आहे.

दक्षिण मुंबईत दोन दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिले. या घटनेची माहिती मिळताच मी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) तसेच महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांशी सतत संपर्कात होतो, असे राऊत म्हणाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याबाबत सांगितले. विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून ७० मिनिटात वीजपुरवठा करण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.

एकीकडे उर्जा मंत्री अशी दखल घेतात तर मग ॲग्रीकल्चर इंडस्ट्रीचा विद्युत पुरवठा १६ तासापर्यत अधिकृतपणे खंडीत केला जातो व बिघाड झालेले ट्रान्सफार्मर १-२ महिने मिळत नाही. याची दखल ऊर्जा मंत्र्यांना घेऊशी वाटत नाही का असा मुद्दा रायते यांनी उपस्थित केला आहे.

शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांना मिळणारी वागणूक फारच भयानक आहे. शेतीकडे उद्योग म्हणून पाहा, असे सल्ले देणाऱ्यांनी यावरदेखील बोलावे, अशी मागणी योगेश रायते (Yogesh Rayte) यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या