Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाइंग्लंड विंडीज निर्णायक कसोटी २४ जुलैपासून

इंग्लंड विंडीज निर्णायक कसोटी २४ जुलैपासून

मँचेस्टर | Manchester

इंग्लंड आणि विंडीज या दोन संघांमध्ये सध्या तीन सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका आता निर्णयक सामन्याकडे येऊन ठेपली आहे. मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ ने बरोबरीत आहेत मालिकेतील तिसरा सामना २४-२८ जुलै दरम्यान मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

विंडीज संघाने साऊथएमटन सामना जिंकून मालिकेची विजयी सुरुवात केली. त्यामुळे विंडीज संघ दुसरा सामना जिंकून मालिका विजय साकार करेल. अशी क्रिकेट चाहत्यांना आशा होती. मात्र इंग्लंड संघाने मँचेस्टर सामना जिंकून मालिकेत एक वेगळीच रंगत निर्माण केली आहे. त्यामुळे अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी करा वा मरा असा असणार आहे.

इंग्लंड संघासाठी जमेची बाजू म्हणजे सिबली, बेन स्ट्रोक्स चांगल्या लयीत आहेत. मँचेस्टर सामन्यात इंग्लंड संघाला ४५० चा टप्पा पार करून देण्यात दोघांनी महत्वाची भूमिका बजावली होती. स्टुअर्ट ब्रॉड ने गोलंदाजीत आपली चमक दाखवून दिली होती. त्याला क्रिस वोक्स सॅम करण यांची सुरेख साथ मिळाली होती.

अखेरच्या कसोटीत जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चर संघात पुनरागमन करणार असल्याने इंग्लंड संघाची गोलंदाजी अधिक मजबूत होणार आहे. तर दुसरीकडे विंडीज संघासाठी जमेची बाजू म्हणजे विंडीज संघाकडून क्रेग ब्रेथवेट , ब्लॅकवूड ब्रूक्स आणि रोस्टन चेस चांगली फलंदाजी करत आहेत. मात्र युवा फलंदाज शाई होपला अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. अखेरच्या कसोटीत चांगली कामगिरी करण्याची संधी त्याला मिळणार आहे.

गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले, तर रोस्टन चेस ,शेनन गॅब्रिएल जेसन होल्डर सातत्याने विकेट्स काढत आहेत. त्यांना इतर गोलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे.

– सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या