मुंबई | Mumbai
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मुकुल देव (Mukul Dev) यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन (Passed Away) झाले आहे. काही दिवसांपासून मुकुल यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, काल (दि.२३) रात्री उपचारादरम्यान मुकुल यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला अभिनेते विंदू दारा सिंग यांनी दुजोरा दिला आहे.
Rest in peace my brother #MukulDev ! The time spent with you will always be cherished and #SonOfSardaar2 will be your swansong where you will spread joy and happiness to the viewers and make them fall down laughing ! pic.twitter.com/oyj4j7kqGU
— Vindu Dara Singh (@RealVinduSingh) May 24, 2025
मुकुल देव यांचा जन्म १७ सप्टेंबर १९७० रोजी नवी दिल्लीतील (New Delhi) एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांनी १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या दूरचित्रवाणी मालिकेने त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. तसेच ‘दस्तक’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यात त्यांनी एसीपी रोहित मल्होत्राची भूमिका साकारली होती. तर टीव्ही व्यतिरिक्त, त्यांनी हिंदी तसेच पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषेतील ६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
दरम्यान, मुकुल यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये ‘वजूद’ (१९९८), ‘कोहराम’ (१९९९), ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’ (२००१), ‘यमला पगला दीवाना’ (२०११), ‘सन ऑफ सरदार’ (२०१२), ‘आर… राजकुमार’ (२०१३) आणि ‘जय हो’ (२०१४) यांचा समावेश आहे. तसेच मुकुल देव यांचा शेवटचा ‘अँट द एंड’ हा हिंदी चित्रपट (Movie) होता.
मुकुल यांच्या अचानक एक्झिटने अनेकांना धक्का
चित्रपट जगतातील एवढ्या प्रसिद्ध चेहऱ्याने अचानक जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूडसह अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, देव यांच्या निधनाच्या बातमीनंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपशिखा नागपालने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर मुकुल देव यांच्यासोबतची एक स्टोरी शेअर करताना लिहिले आहे की, मुकुल देव आता या जगात नाही यावर माझा विश्वासच बसत नाही.