Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबॉलिवूडचे 'ही मॅन' धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मुलगी ईशा देओलने दिली महत्वाची माहिती

बॉलिवूडचे ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मुलगी ईशा देओलने दिली महत्वाची माहिती

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय उपचार सुरु आहेत. मात्र, आज सकाळी माध्यमांनी त्यांचं निधन (Passed Away) झाल्याच्या बातम्या झळकावल्या होत्या. परंतु, धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने त्यांचं निधन झाले नसल्याचे म्हणत ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगितलं आहे.

- Advertisement -

ईशा देओलने (Esha Deol) याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट केली असून, त्यामध्ये म्हटलं की, “माझे वडील स्थिर आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करत आहोत. माझ्या वडिलांसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद, असे तिने म्हटले आहे.

YouTube video player

धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सरुवातीला उपचारांना ते प्रतिसाद देत होते. पण, नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती. त्यामुळे त्यांना आयसीयू मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले होते. धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत, असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती. यानंतर आता त्यांच्या मुलीने देखील तब्येतीबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 मध्ये त्याला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘फूल और पत्थर’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘धरमवीर’, ‘आंखे’, ‘राजा जानी’,,” ‘गुलामी’, ‘प्रतिज्ञा’, ‘नये जमाना’, ‘ बर्निंग ट्रेन’ आणि ‘यादों की बारात’ यासह अनेक हिट चित्रपट दिले.

धर्मेंद्र यांची कारकिर्द

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराली या गावात झाला. त्यांनी १९६० साली दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर फुल और पत्थर या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्म फेअर पुरस्कार ही मिळाला. धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...