Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याकाही माजी नगरसेवकांचा होणार शिंदे गटात प्रवेश; महानगरप्रमुख तिदमे यांचा दावा

काही माजी नगरसेवकांचा होणार शिंदे गटात प्रवेश; महानगरप्रमुख तिदमे यांचा दावा

नाशिक । फारूक पठाण Nashik

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तळागाळात रुजवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी आमच्यावर सोपवली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेची कामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे नाशिकचा दौरा करणार असून त्यांच्या उपस्थितीत नाशिकमधील आणखी काही शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच नेते व पदाधिकारी प्रवेश करणार असल्याच्या दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित नाशिक शहरप्रमुख बंटी तिदमे ( Bunty Tidme) यांनी केला आहे. ते ‘देशदूत’शी बोलत होते.

- Advertisement -

शिवसेना पक्ष वाढीसाठी मागील दोन दशकांपेक्षा जास्त काळ आम्ही अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र, पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी नेहमी आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला. नवीन नाशिक भागातील ऐतिहासिक रणगाड्याचे उद्घाटन असो की इतर विकासकामे पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकार्‍यांनी पक्षातील मुंबईतील नेत्यांना आमच्यापर्यंत पोहोचू दिले नाही.

गटबाजीमुळे आम्ही वैतागलो होतो तसेच बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचारदेखील महाविकास आघाडीमुळे पुसत होते, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे तिदमे यांनी सांगितले. नाशकात भाजप-सेनेचा भगवा फडकवा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तसेच नाशिकमधील पंधरा ते वीस माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाट्यावर असल्याचा दावा तिदमे यांनी केला आहे.

मागील चार महिन्यांपासून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा राजकीय सामना रंगला आहे. पक्षासह धनुष्यबाण हे चिन्ह ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाकडून दावे करण्यात आले आहेत. दरम्यान, ज्यावेळी शिंदे गटाने सेनेतून बाहेर पडत भाजपसोबत जुळवून घेत सत्तेत सहभागी झाले आहे. आता शिंदे गटाकडून तिदमे यांची नियुक्ती महानगरप्रमुखपदी केल्याने त्यांच्यावर आगामी महापालिका निवडणुकीची धुरा असणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी तिदमे यांना दिले असून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अनेकजण शिंदे यांच्याकडे येण्यासाठी तयार असल्याचेही तिदमे यांनी म्हटले आहे. पुढच्या काही दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. सेनेतील एका पदाधिकार्‍याकडून वारंवार डावलले जात होते. वरिष्ठांपर्यंत पोहोचू दिले जात नव्हते. एखादा मोठा कार्यक्रम घेतला तर पक्षप्रमुख, आदित्य ठाकरे येणार नाहीत यासाठीच प्रयत्न केले जायचे. आम्ही पक्षासाठीच काम करतो. परंतु काहीजणांना हे आवडत नव्हते. येत्या काही दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, आम्ही आमचे काम सुरू करणार असून आगामी पालिका निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत.

पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची काहीच ताकद नसताना त्यांच्यासोबत जाण्याची तयारी असल्याचा तिदमे यांनी दावा केला आहे. ही आघाडी कोणालाही नको आहे. तसेच याचे स्वागत कोण करणार? शिवसेनेतील नेतेमंडळी अजूनही एकसंघ असल्याचा दावा करत असली तरी मात्र पक्षात अद्यापही गटबाजी सुरू असून या गटबाजीला अनेकजण वैतागल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या