Friday, May 3, 2024
Homeनगरइपीएस 95 पेन्शनर्स प्रश्न दोन महिन्यांत मार्गी लावणार- डॉ. कराड

इपीएस 95 पेन्शनर्स प्रश्न दोन महिन्यांत मार्गी लावणार- डॉ. कराड

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

इपीएस 95 पेन्शनधारकांच्या प्रश्नासंदर्भात येत्या दोन महिन्यात मंत्री डॉ. राजेंद्रसिंह, भूपेंद्र यादव व पदाधिकारी यांच्या बरोबर बैठक घेवून मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवतराव कराड यांनी केले.

- Advertisement -

औरंगाबाद अग्रसेन भवन येथे झालेल्या राज्यस्तरीय पेन्शनर बचाव मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत होते. ते पुढे म्हणाले, गरिबीची जाण असलेला मी कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय संघर्ष समिती अध्यक्ष अशोकराव राऊत यांच्याबरोबर आपण चर्चा पण केली. पेन्शनरांचे 6 लाख कोटी जमा असून त्यावर व्याज जमा होते. ते आपल्याला मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयाने पेन्शनरांच्या बाजूने निर्णय दिला. हा विषय आपण समजून घेतला असून प्रश्न सुटेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन असे. श्री. कराड म्हणाले.

अशोकराव राऊत यांनी पेन्शनरांच्या व्यथा मांडल्या. अल्प पेन्शनमुळे जीवन जगणे अवघड आहे. 35 वर्षे ज्येेष्ठ देशाची सेवा करून हालाखीचे जीवन जगत आहे. त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून हक्काची कमीतकमी 7500 रुपये दरमहा पेन्शन अधिक महागाई भत्ता मिळावा. वैद्यकीय मोफत सुविधा द्यावी, अशा मागण्या आहेत. पंतप्रधान यांनीही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

मेळाव्यात महाराष्ट्र अध्यक्ष आंबेकर, पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती आरास, डॉ. पी. एन. पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी संघटक सरिता नारखेडे, प. भारत संघटक सी. एम. देशपांडे, पश्चिम बंगाल तपन दत्ता, महिला रा. आघाडी उपाध्यक्षा जयश्री किवळेकर, कविता भालेराव, महाराष्ट्र कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, जिल्हाध्यक्ष वाडगावकर, शहर अध्यक्ष सुरेश पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग जाधव आदींची भाषणे झाली.

यावेळी अहमदनगर जिल्ह्यातून नारायण होन, संपत समिंदर, सुकदेव आहेर, बापूराव बहिरट या पदाधिकार्‍यांसह महाराष्ट्रातील 5 ते सहा हजार पेन्शनर्स उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या