नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेच्या राजकारणात एपस्टीन फाइल्सनी सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. या फाइलमधील गोष्टी बाहेर आल्याने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट सुरु झाले आहेत. आता अजून एक मोठा पर्दाफाश झाला आहे. अलीकडेच एक फोटो समोर आलाय, त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन मुलींसोबत पूलमध्ये आंघोळ करताना दिसताय. अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचा संच प्रसिद्ध केला आहे. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी पहाटे अडीच वाजता पाच संचांमध्ये सुमारे ३,००,००० कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आली. या फायलींमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप स्टार मायकल जॅक्सन, अभिनेता ख्रिस टकर आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यासारख्या प्रमुख व्यक्तींचे फोटो समाविष्ट आहेत.
प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये काही फोटो असे आहेत ज्यात बिल क्लिंटन स्विमिंग पूलमध्ये मुलींसोबत वेळ घालवताना आणि पार्टी करताना दिसत आहेत. पहिले चार संच एकत्र प्रसिद्ध झाले होते, तर पाचवा सेट काही तासांनंतर सार्वजनिक करण्यात आला. एकूण ३,५०० हून अधिक फायली उघड झाल्या आहेत, ज्यामध्ये २.५ जीबी पेक्षा जास्त डेटा आहे. तथापि, अनेक फोटो कुठे आहेत हे स्पष्ट नाही. पहिल्या टप्प्यातील कागदपत्रे प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे.
नव्याने प्रसिद्ध झालेल्या फाइल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा फारसा उल्लेख नाही, परंतु त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, संगीतकार डायना रॉस, मिक जॅगर आणि मायकल जॅक्सन यांचे काही फोटोज आहेत. यात इतर उच्च-प्रतिष्ठित व्यक्तींचा देखील समावेश आहे. यात ब्रिटनचे माजी प्रीन्स अँड्र्यू, त्यांची माजी पत्नी सारा फर्ग्युसन, अभिनेता केविन स्पेसी आणि ब्रिटिश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांचाही समावेश आहे.
ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचे एपस्टाईन आणि त्यांचे जवळचे सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांच्यासोबतचे जुने फोटो देखील समाविष्ट आहेत. तथापि, अहवालात असेही स्पष्ट केले आहे की हे सर्व कागदपत्रे आणि छायाचित्रे आधीच सार्वजनिक क्षेत्रात आहेत आणि त्यांनी कोणतीही नवीन किंवा आश्चर्यकारक माहिती उघड केलेली नाही.
न्याय विभागाचे स्पष्टीकरण
न्याय विभागाने असेही म्हटले आहे की काही कागदपत्रे सध्या चालू असलेल्या तपासामुळे किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव राखून ठेवण्यात आली आहेत. जेफ्री एपस्टीन हा एक वित्तपुरवठादार आणि दोषी लैंगिक गुन्हेगार होता ज्याचा तुरुंगात मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १८ नोव्हेंबर रोजी कायद्यावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये एपस्टीनशी संबंधित सर्व कागदपत्रे ३० दिवसांच्या आत प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले.
न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी टॉड ब्लँच म्हणाले की, एपस्टाईनशी संबंधित अधिक कागदपत्रे येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जातील, परंतु संभाव्य पीडितांची ओळख संरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे भाग संपादित केले जातील.
आत्तापर्यंत या व्यक्तींचे फोटो उघड
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये आणि छायाचित्रांमध्ये अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि पॉप स्टार मायकल जॅक्सन यांचा समावेश आहे. ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू हे त्यांच्या पत्नी सारा फर्ग्युसनसोबत देखील दिसत आहेत. छायाचित्रांमध्ये अमेरिकन टीव्ही होस्ट ओप्रा विन्फ्रे, हॉलिवूड अभिनेते केविन स्पेसी आणि ख्रिस टकर तसेच अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन देखील दिसत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




