Friday, May 3, 2024
Homeजळगावअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एरंडोल – Erandol – प्रतिनिधी :

एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हिमालय पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने जाणार्‍या

- Advertisement -

अज्ञात वाहनाने ट्रिपलसीट जाणार्‍या दुचाकीस्वारांना धडक दिल्याने नितीन नारायण भोई वय वर्ष 23 हा जागीच ठार झाला तर दोन युवक गंभीर जखमी झाले.

रात्री अकरा वाजेच्या सुमारास एसटी स्टँड जवळील हिमालय पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक एम एच 19 डीजे 64 46 या या दुचाकी वाहन आला जोरदार धडक दिल्याने नितीन नारायण भोई 23 राहणार गडी खाली एरंडोल हा जागीच ठार झाला.

तर गणेश बारकू भोई 22 व प्रकाश ज्ञानेश्वर भोई हे दोघं गंभीररीत्या जखमी झाले अतुल सोनवणे यांनी आपल्या चार चाकी वाहनाने मयत व जखमी युवकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .

यावेळी नगरसेवक बबलू चौधरी व नगरसेवक कुणाल महाजन बाळा पैलवान यांनी सहकार्य केले. घटनेची माहिती मिळताच शहरातील युवक व नागरिकांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या