Monday, May 27, 2024
Homeधुळेइलेक्ट्रो-होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रश्न सोडण्यासाठी शासकीय समितीची स्थापना

इलेक्ट्रो-होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रश्न सोडण्यासाठी शासकीय समितीची स्थापना

धुळे Dhule। प्रतिनिधी

राज्यातील इलेक्ट्रो होमिओपॅथी (Electro homeopathy) डॉक्टरांच्या प्रश्नांच्या (doctor’s questions) सोडवणूकीसाठी शासकीय समितीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रो-होमिओपॅथी चिकित्सक समितीची (Maharashtra State Electro-Homeopathy Physicians Committee) स्थापना (Installation) करण्यात आली आहे. या समितीची आज संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत धोरणात्मक व सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहीती मेडीकल असोशिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

- Advertisement -

धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इलेक्ट्रो होमिओपॅथी डॉक्टरांच्या विविध प्रश्नांसदर्भात आ. कुणाल पाटील यांच्या पुढाकारातून वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार मेडीकल असोशिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेचे पदाधिकारी व वैद्यकीय विभागाचे सर्व अधिकार्‍यांची दि.23 मार्च रोजी बैठक घेण्यात आली होती. बैठकीत संघटनेच्या मागणीनुसार इलेक्ट्रो होमिओपॅथी डॉक्टरांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी एका शासकीय समितीची स्थापना करण्यात यावी अशी सूचना आ. कुणाल पाटील यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रो-होमिओपॅथी चिकित्सक समितीची स्थापना करण्यात आली आहे.

समितीत अध्यक्ष म्हणून डॉ.अजय चंदनवाले सहसंचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन, तर सदस्य सचिव म्हणून डॉ.सुनिल ललवाणी विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून डॉ. भालचंद्रा चिखलकर, डॉ. सुडे, डॉ. बाहूबली शहा, डॉ. अजित सिंह संघटना पदाधिकारी, डॉ. सतिष जगदाळे अध्यक्ष मेडीकल असोशिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटना यांचा समावेश आहे.

आज दि. 23 जून रोजी संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई येथे या समितीतील पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या बैठकीत इलेक्ट्रो होमिओपॅथी डॉक्टरांना बोगस संबोधण्यात येऊ नये. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि केंद्र, राज्य शासन निर्णयाच्या आधारावर नवीन सुधारित जी.आर. शासनाने काढावा. राजस्थान सरकारने दि. 9 मार्च 2018 रोजी इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा पध्दतीस मान्यता दिली आहे.

त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही मान्यता द्यावी अशा मागण्या समितीसमोर ठेवण्यात आल्या. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मेडीकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सतिष जगदाळे, सचिव डॉ. प्रशांत सोनवणे, सह सेक्रटरी डॉ. विलास बिरारीस धुळे, उपाध्यक्ष डॉ.शकील देशमुख, डॉ. नरेश सोनभद्र, डॉ. अनिल झोडे, डॉ. विकास कांगले, डॉ. चेतन राभिया, डॉ.राजू कानेरकर, डॉ. सुधीर शिनगारे, डॉ.संजय पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या