Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकृषिमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही 'या' तालुक्यात पंचनामे नाहीच; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही ‘या’ तालुक्यात पंचनामे नाहीच; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्याच्या विविध भागात दि.14 ते 19 मार्च या कालावधीत अवकाळी पावसाने (Unseasonal rain) मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे (farmers) नुकसान झाले आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यामध्ये (niphad taluka) अवकाळी पाऊस (Unseasonal rain) व गारपीट होऊन मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीचे पंचनामे (panchanama) हे अध्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. निफाड तालुक्यात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी दौरा करून पाहणी केली. यानंतरही पंचनामे होत नसल्याने रुई-धानोरे परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा (agitation) इशारा दिला आहे.

महसूल व कृषी विभागाच्या (Department of Revenue and Agriculture) कर्मचाऱ्यांनी संपाच्या नावाखाली हे काम केले नाही. कामाचा व्याप नको म्हणून वरिष्ठांना पावसाच्या नुकसानीची टक्केवारी ही निरंक दाखवण्याचा प्रकार कृषी विभागाचे (Department of Agriculture) कर्मचारी करत आहेत. अशी तक्रार करत या भागातील शेतकऱ्यांनी कृषी व महसूल विभागा विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीआहे.

निफाड तालुक्याच्या (niphad taluka) पूर्व भागात रुई, धानोरे, धरणगाव, डोंगरगाव, गोळेगाव, खेडले झुंगे, कोळगाव, गाजरवाडी या गावांमध्ये अवकाळी पावसाने कांदा, गहू, द्राक्ष, हरभरा आदी पिकांचे नुकसान (crop damage) झाले आहे. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले तर महसुली विभागाचे तलाठी यांना बोलावून घ्या व त्यांना पंचनामे करायला सांगा.असे उत्तर दिले जात आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे ? पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नुकसानीचे पंचनामे वेळीच झाल्यास शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामाकरता घेतलेल्या कर्जावरील व्याज हे नुकसानीच्या अनुदानामधून वर्ग होईल.त्यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा निर्माण होणार आहे. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

… तर जिल्हाधिकारी दालनात बैठे आंदोलन

नुकसानीचे पंचनामे होणार नसतील तर जिल्हाधिकारी गंगाथरण डी.यांच्या दालनात बैठे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे निवृत्ती चव्हाणके, सुधाकर रोटे, वाल्मीक ठोंबरे, बापूसाहेब तासकर, श्रावण गायकवाड, सिद्धेश्वर बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संपतराव रोटे, रुईचे माजी उपसरपंच सुभाष रोटे, रुई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन दिलीपराव गायकवाड,रुई सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणपतराव खंडागळे, राजाराम कोकाटे, माधवराव रोटे, शंकर गायकवाड,

धरणगावचे सरपंच व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कृषी मूल्य आयोगाचे राज्य सदस्य शिवनाथ जाधव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत पवार, निफाड पंचायत समितीचे उपसभापती गयाताई सुपनार, वाकद ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्र पाटील, बद्रीनाथ गाजरे,अनिल दाते,बाळासाहेब तासकर, विलास तासकर, प्रकाश भास्कर, नवनाथ रोटे, राजेंद्र कणसे, नवनाथ कणसे, राजाराम गायकवाड, गोळेगावचे सरपंच दिलीप मुद्गुल, मोतीराम मुद्गुल, राजेंद्र मुद्गुल, संदीप पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या