Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNirmala Gavit : इगतपुरी मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार; निर्मला गावित काँग्रेसमध्ये परतणार?

Nirmala Gavit : इगतपुरी मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार; निर्मला गावित काँग्रेसमध्ये परतणार?

नाशिक | Nashik

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. या दोन्ही पक्षांतील जागावाटप सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. मात्र , या जागावाटपाच्या आधीच जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) चांगलाच चर्चेत आला असून माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) या काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! चांदवडमधून राहुल आहेरांची भावासाठी माघार; पक्षाकडे उमेदवारी देण्याची केली मागणी

काही दिवसांपूर्वी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हातात बांधले होते. खोसकर यांच्यावर राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय पक्षाला होता. त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे खोसकर यांची चलबिचल होत होती. त्यानंतर अखेर सोमवारी रात्री खोसकर यांनी आपल्या समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (Ajit Pawar NCP) प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसवर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार शोधाशोधीची वेळ आली होती.

हे देखील वाचा : Nashik News : मुलगा झाल्याचे सांगितले अन् सोपवली मुलगी

मात्र, काँग्रेसने आता थेट खोसकरांच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार आणि माजी आमदार निर्मला गावित यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच गावित यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश होण्याची शक्यता आहे. निर्मला गावित सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत. त्यामुळे गावित यांच्या पक्षप्रवेशाला कुठलीही अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता माजी आमदार निर्मला गावित यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : Nashik Civil Hospital News : बाळ अदलाबदल प्रकरणी सात डॉक्टरांसह एका परिचारिकेचे निलंबन

दरम्यान, महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) इगतपुरी विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. तर महायुतीमध्ये (Mahayuti) ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला जाणार होती. पंरतु, खोसकर यांनी महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तर गावित यांचा पक्षप्रवेश झाल्यास काँग्रेसमधील इच्छुकांचा देखील हिरमोड होणार आहे.

हे देखील वाचा : Sharad Pawar On Jayant Patil : विधानसभेसाठी जागांचा निर्णय…; शरद पवारांच जयंत पाटलांबाबत मोठं विधान, तर जयंत पाटील म्हणाले,…

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाबाबत निर्मला गावित नेमक्या काय म्हणाल्या?

माझे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसोबत बोलणे झाले असून त्यांनी मला पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची विंनती केली आहे. त्यामुळे मी लवकरच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. तसेच काँग्रेस नेत्यांसह मविआतील नेत्यांनी मला इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास मी नक्कीच निवडणूक लढवेल,अशी प्रतिक्रिया माजी आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) उपनेत्या निर्मला गावित यांनी देशदूतशी बोलतांना दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या