नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कर्नाटकच्या हासन लोकसभेचे माजी खासदार आणि देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. प्रज्वल रेवण्णाला बलात्कार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात कर्नाटक न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात रेवण्णाला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने दोषी ठरवल्याचा निर्णय देताच, रेवण्णा न्यायालयातच ढसाढसा रडू लागल्याचे सांगितले जाते. माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला सेक्स टेप प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.
कर्नाटकच्या विशेष न्यायालयाने आज हा निकाल दिला. घरकाम करणाऱ्या ४७ वर्षीय महिलेवर रेवण्णा कुटुंबाच्या फार्महाऊसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णांना दोषी ठरवले गेले आहे. २ ऑगस्ट रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाने आज आपला निकाल सुनावताच प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयातच रडू कोसळले असे समजते आहे. प्रज्ज्वल रेवण्णावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. प्रज्ज्वल रेवण्णा याच्यावरील आरोपांमुळे जेडीएसने त्याला पक्षातून निलंबितही केले होते.
प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले होते. या पथकाने १२० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तसेच पीडितांच्याही तक्रारी घेऊन महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. याआधारावर प्रज्ज्वलवर कलम ३७६ (२) (न) नुसार वारंवार बलात्कार करणे, कलम ५०६, कलम ३५४ अ, ब आणि क नुसार विविध गुन्हे दाखल केले होते.
काय आहे प्रकरण?
प्रज्वल रेवण्णाच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्याच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. याशिवाय बंगळुरूमध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक पेन ड्राइव्ह सापडले होते. पेन ड्राइव्हमध्ये ३ हजार ते ५ हजार व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रज्वल महिलांचा लैंगिक छळ करताना दिसला. व्हिडिओंमध्ये महिलांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. प्रज्वल रेवण्णावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल झाले. यासोबतच त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
व्हिडीओ बाहेर कसे आले?
२०२२ साली कार्तिक आणि प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्याच्या कुटुंबियांचे जोरदार भांडण झाले. ज्यामुळे कार्तिकने त्यांची नोकरी सोडली. कार्तिकने पुढे सांगितले की, प्रज्ज्वल रेवण्णाच्या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह त्यानेच भाजपाचे नेते आणि वकील जी. देवराजे गौडा यांना दिला होता.
कोण आहे प्रज्वल रेवण्णा?
प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. प्रज्वलचे आजोबा पंतप्रधान, काका मुख्यमंत्री आणि वडील मंत्री होते. १० वर्षे जेडीएसमधून राजकारण करताना रेवण्णाने २०१९ मध्ये हसन मधून लोकसभा निवडणूकही जिंकली. मात्र, २०२४च्या निवडणुकीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




