Friday, May 3, 2024
Homeनगरमाजी सैनिकाची 11 लाखांची फसवणूक

माजी सैनिकाची 11 लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून एका माजी सैनिकाची 11 लाख 15 हजार 952 रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 9) सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात एका टेलिग्राम धारक व्यक्ती विरोधात भादंवि कलम 419, 420 सह आयटी अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बाराबाभळी (ता. नगर) येथे राहणार्‍या एका माजी सैनिकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 31 जुलै 2023 ते 7 ऑगस्ट 2023 दरम्यान ही घटना घडली आहे. एका टेलिग्राम धारक व्यक्तीने फिर्यादीसोबत संपर्क केला. त्यांचा विश्वास संपादन करून पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखविले. 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादीनेही त्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण 11 लाख 15 हजार 952 रूपये भरले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या