Friday, May 3, 2024
Homeनगरमाजी सैनिक भोर खून प्रकरण; मोतीयानी, गोसावीच्या कोठडीत वाढ

माजी सैनिक भोर खून प्रकरण; मोतीयानी, गोसावीच्या कोठडीत वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बोल्हेगाव (ता.नगर) येथील रहिवाशी माजी सैनिक विठ्ठल भोर (वय 48) यांच्या खूनातील आरोपी मनोज मोतीयानी (वय 33), स्वामी गोसावी (वय 28, दोघे रा. सावेडी) यांच्या पोलिस कोठडीमध्ये तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

माजी सैनिक भोर हे 29 जुलै रोजी गायब झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. लोणी- तळेगाव रस्त्यावर गोगलगाव (ता.राहाता) शिवारात दुसर्‍या दिवशी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मनोज मोतीयानी आणि स्वामी गोसावी या दोघांना अटक केली होती.

दोघे ही मागील पाच दिवसांपासून पोलिस कोठडीत आहेत. दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना राहाता येथील न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले आणि अ‍ॅड. संजय दुशिंग यांनी बचावाचा युक्तीवाद केला. गेल्या पाच दिवसांमध्ये आरोपींकडून काही महत्वाच्या वस्तू जप्त झालेल्या नाहीत. केवळ संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे जादा पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, असे म्हणणे सादर केले. सरकार पक्षातर्फे तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांनी खुनासारखा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढविलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या