Thursday, September 19, 2024
Homeनगरपरीक्षा नगर झेडपीची अन् लेखी पेपर नागपूर, वर्धा, मुंबईत

परीक्षा नगर झेडपीची अन् लेखी पेपर नागपूर, वर्धा, मुंबईत

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

मागील सहा महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद नोकर भरतीला अखेर मुहूर्त लागला. मात्र, आरोग्यसेवक व इतर पदांसाठी उमेदवारांना परीक्षेसाठी थेट नागपूर, वर्धा, मुंबई आणि नाशिक असे दूरवरचे केंद्र मिळाल्याने उमेदवारांची मोठी गैरसोय झाली आहे.

येथे परीक्षेला जाण्यासाठीच चार ते पाच हजारांचा खर्च असल्याने कितीजण परीक्षेला हजेरी लावतात, याविषयी साशंकताच आहे. आधीच नोकरीसाठी नशिबाशी परीक्षा करणार्‍यांची आताची यंत्रणमुळे जीवघेणी परीक्षा सुरू आहे.

नगरसह राज्यात जिल्हा परिषदांची 19 हजार पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. नगर जिल्हा परिषदेने या पदांची जाहिरात 5 ऑगस्ट 2023 ला प्रसिद्ध केली होती. यात जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गांतील 937 पदे भरण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक 727 पदे आरोग्य विभागाची आहेत. या भरतीसाठी जिल्ह्यातून 44 हजार 726 अर्ज प्राप्त झाले.

हे देखील वाचा : हिट अ‍ॅण्ड रन! अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी

अर्ज भरल्यानंतर पहिल्या टप्प्यात 19 पैकी 11 संवर्गांची परीक्षा कशीबशी डिसेंबर 2023 पर्यंत झाली. मात्र 50 टक्क्यांहून अधिक अर्ज ज्या संवर्गात आहेत त्या आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के हंगामी फवारणी), आरोग्य सेवक (पुरूष इतर 40 टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा पाच संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक गेल्या सहा महिन्यांपासून जाहीर होत नव्हते. अखेर ते 27 जून 2024 रोजी जाहीर झाले.

दरम्यान, आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरूष या पदांसाठी मोठ्या प्रमाणात जागा असल्याने येथे अर्जही अधिक प्राप्त झाले आहेत. उमेदवारांनी परीक्षेसाठी अहमदनगर, संभाजीनगर, पुणे अशा जवळच्या परीक्षा केद्रांचे पर्याय अर्ज भरताना भरले. मात्र जेव्हा हॉलतिकीट प्राप्त झाले, त्यात अनेकांना नागपूर, वर्धा, मुंबई, ठाणे, अमरावती असे दूरवरचे परीक्षा स्थळ देण्यात आले आहे. परीक्षेसाठी एवढे दूर कसे पोहोचणार, असा प्रश्‍न उमेदवारांना व त्यांच्या पालकांना पडला आहे.

हे देखील वाचा : हार्दिक-नताशाचा अखेर घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक पोस्ट

याबाबत अनेक उमेदवारांनी शासनाच्या या ढिसाळ नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली. आरोग्य सेवक (50 टक्के हंगामी फवारणी) या पदासाठी 187 जागा असून 23 व 24 जुलै 2024 रोजी या पदाची परीक्षा आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना जवळपास सर्वच राज्यात ठिकठिकाणी दूरवरचे परीक्षा मिळाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या