Tuesday, May 7, 2024
Homeनंदुरबारनंदूरबारच्या दांपत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका

नंदूरबारच्या दांपत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका

नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar

नंदूरबार व पूणे (pune) येथून कार्यरत असलेल्या एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजीच्या (Digital technology) डिफेंस क्षेत्रात केलेल्या योगदानाचे डिफेंस एक्स्पो २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत कौतूक करण्यात आले.

- Advertisement -

नुकत्याच अहमदाबाद (Ahmedabad) येथे झालेल्या डिफेंस एक्स्पो (Defense Expo) २०२२ हे संरक्षण क्षेत्रातील प्रदर्शन १८ ते २२ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झाले. यात संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत यावर अधिकाधीक भर देण्यात आला होता. डिफेंस एक्स्पोत अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांनी भाग घेतला होता. यात एक्सलंसियाने मदत केलेल्या कंपन्यांनी ही त्यांची उत्पादने प्रदर्शित केली होती.

सर्व कंपन्यांनी एक्सलंसियाने उपलब्ध केलेल्या टेक्नॅालॅाजीचा विशेष उल्लेख केलेला होता. त्यामूळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेना प्रमूख, संरक्षण मंत्री व राजदूत यांच्याकडून एक्सलंसियाने केलेल्या कामाची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली.

एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी संरक्षण क्षेत्रातील अनेक कंपन्यांना (कल्याणी, किर्लोस्कर, एअर फोर्स व इंडीयन नेव्ही) टेक्नॅालॅाजी व इतर बाबीत मदत करत असते. सध्या एक्सलंसिया नंदूरबार व पूणे येथून कार्यरत असून अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांना टेक्नॅालॅाजी सर्विसेस देत असते.

एक्सलंसियाच्या व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता बोरसे व संचालक विजय बोरसे यांच्या प्रयत्नामुळेच एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी कंपनी विविध स्तरावर विशेष ओळख निर्माण करीत आहे.

याबाबत कंपंनीचे डायरेक्टर विजय बोरसे यांनी सांगीतले की, कंपंनी संरक्षण क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत असून संरक्षण क्षेत्रातील अनेक क्लासिफाईड प्रोजेक्ट यशस्वीरीत्या व कमीत कमी वेळात पूर्ण केले आहेत. त्यामूळे अल्पावधीत एक्सलंसियाचे या क्षेत्रात नाव झळकले आहे.

अहमदाबाद येथील डिफेंस एक्सपोमूळे एकसलंसीयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर आता ओळख निर्माण झाली आहे. कंपंनी भारताचे संरक्षण क्षेत्रातील हीत राखूनच परदेशी कंपन्यांबरोबर काम करेल. या कामगीरीमूळे एक्सलंसीयाचे अनेक स्तरातून कौतूक होत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या