Friday, May 3, 2024
Homeजळगावमुंबई ते पाटणा, रक्सौल दरम्यान विशेष गाड्यांचा विस्तार

मुंबई ते पाटणा, रक्सौल दरम्यान विशेष गाड्यांचा विस्तार

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal

मुंबई ते पाटणा व रक्सौल दरम्यान चालविण्यात येणार्‍या विशेष गाड्यांचा विस्तार करुन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करु देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

यात गाडी क्र. ०३२६० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पाटना द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष सेवा (मंगळवार व शुक्रवार) ६ एप्रिल ते २ जुलैपर्यंत. ०३२५९ पाटना- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष सेवा (बुधवार व रविवार) दि. ४ एप्रिल ते ३० जुनपर्यंत. ०२५४६ लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल अतिजलद साप्ताहिक विशेष (शनिवार) सेवा दि. ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत. ०२५४५ रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद साप्ताहिक विशेष (गुरुवार) सेवा १ एप्रिल ते २४ जूनपर्यंत. ०५५४८ लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल साप्ताहिक विशेष सेवा (बुधवार) दि. ७ एप्रिल ते ३० जूनपर्यंत. ०५५४७ रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (सोमवार) ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत. ०५२६८ लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल साप्ताहिक विशेष सेवा (सोमवार) ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत. ०५२६७ रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (शनिवार) ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.

सदर गाड्यांची संरचना, वेळ व थांबे यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या गाड्यांमधून केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. तसेच प्रवाशांना कोकोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या