नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भद्रकालीतील (Bhadrakali) घासबाजार येथील स्लॉटर हाऊसमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करताना एकाला अटक (Arrested) करण्यात आली आहे. हा संशयित हा शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सराईत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पथकाने ही कामगिरी केली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : एमडीचा धंदा तेजीतच; नाशकात विक्री करणारे दाेघे अटकेत
याबाबत अधिक माहिती अशी की, रफिक जाफर कुरैशी (५६, रा. वडाळागाव, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार विवेकानंद पाठक, हवालदार अतुल पाटील यांना बुधवारी (दि.१९) भद्रकालीतील घासबाजारातील कत्तल खान्यात जनावराची कत्तल सुरु असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. त्यावेळी संशयित रफिक कुरेशी त्याठिकाणी गोवंशीय जनावराची कत्तल करताना आढळून आला.
हे देखील वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात होणार सहभागी
यावेळी पथकाने ६० हजार रुपयांचे गोवंशीय मांस, २० हजारांचा गोऱ्हा असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच संशयित रफिक हा शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. भद्रकाली पोलिसात (Bhadrakali Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक विवेकानंद पाठक, बेंडकोळी, संजय सानप, वाल्मिक चव्हाण, अतुल पाटील, गांगुर्डे, साळुंके, सय्यद, जुंद्रे यांनी कामगिरी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा