Tuesday, July 23, 2024
Homeनाशिकमनसे अध्यक्ष राज ठाकरे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात होणार सहभागी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात होणार सहभागी

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन अभिषेक पूजाही करणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

दर वर्षाप्रमाणे यंदाही संत निवृत्तिनाथ महाराजांची (Saint Nivrittinath Maharaj) पालखी चांदीच्या रथातून आषाढी वारीसाठी गुरुवारी आज (दि.२०) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास समाधी मंदिरापासून सवाद्य मिरवणुकीने प्रथम कुशावर्त तीर्थावर स्नान व पूजाविधी झाल्यानंतर तेथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwar Jyotirlinga) मंदिरापासून मार्गस्थ होणार आहे. यासाठी निवृत्तिनाथ समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

हे देखील वाचा : Nashik News : शहर पोलीस भरतीला पहिल्याच दिवशी २१६ उमेदवारांची दांडी

दरम्यान,या पालखी सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असून काल रात्रीच त्यांचे नाशकात आगमन झाले आहे.

हे देखील वाचा : आठवड्यासाठी नाफेडचा कांदा दर 2,555 रुपये

त्यानंतर आज गुरुवारी (दि.२०) रोजी दुपारच्या सुमारास ते सहकुटुंब त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या आषाढीवारी पायी पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तर दुपारी दीड वाजेच्या सुमारास राज ठाकरे यांच्या हस्ते निवृत्तिनाथ महाराज यांच्या मंदिरात आरती होणार आहे.यानंतर ते समाधीचे दर्शन घेऊन सर्व वारकरी संप्रदाय व दिंड्यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.तसेच दुपारी दोन वाजता राज ठाकरे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन व अभिषेक पूजाही करणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या