Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्याफेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन; काही वेळाने सेवा पूर्ववत

फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन; काही वेळाने सेवा पूर्ववत

नाशिक | प्रतिनिधी

आज रात्री नऊ वाजेपासून काही काळासाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याचे अनुभवास आले. इंस्टाग्रामवर काहीच नवीन लोड होत नव्हते, तर लोकांचे फेसबुक अचानक लॉग आऊट झाले होते.

- Advertisement -

दरम्यान फेसबुकला पासवर्ड आणि युजर आयडी टाकून लॉगइन करण्याचा प्रयत्न केला तरी पासवर्ड देखील चुकीचा दाखवत होता. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामकडून याबाबत कोणतीही अशी माहिती देण्यात आली नव्हती.

मात्र काही काळाने हे सर्व पूर्ववत झाले. दरम्यान नेटकर्‍यांचे काहीकाळापुरते हाल झाले. मात्र साधारण दोन तासाने सर्वकाही पूर्ववत झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या