Friday, May 16, 2025
Homeधुळेबेघर वस्तीतील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

बेघर वस्तीतील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

धुळे । dhule प्रतिनिधी

- Advertisement -

शिरपूर तालुक्यातील बोराडी (Boradi) गावातील बेघर वस्तीतील (Homeless slums) एका घरात सुरू असलेल्या बनावट (fake) देशी दारूच्या (country liquor) कारखान्यावर तालुका पोलिसांनी छापा (Taluka Police raiding) टाकत कारवाई (action) केली. तेथून दीड लाखांचा मुद्येमाल जप्त(Seizure of valuables) करण्यात आला. संशीयत आरोपी पसार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोराडी गावातील पेट्रोल पंपा समोर असलेल्या बेघर वस्तीतील राजेश विश्वास पावरा हा त्याच्या घरात लोकांचे आरोग्यास अपायकारक होईल, अशी बनावट दारु विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली.

त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईसाठी रवाना केले. पथक बोराडी गावातील पेट्रोलपंप समोरुन पायी बेघर वस्तीकडे जात असतांना एक बेघरातुन एक इसम पळतांना दिसल्याने त्यास पथकाने आवाज देत थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो गल्ली बोळातुन अंधाराचा पळुन गेला. त्यानंतर तो ज्या घरातुन पळाला त्या बेघरात छापा टाकुन तपासणी करण्यात आली. तेव्हा दरवाज्यालगत तसेच किचन रुममध्ये देशी दारुच्या बाटल्या व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिसून आले.

तेथून 1 लाख 34 हजार 400 रुपये किंमतीच्या टँगोपंच असे लेबल असलेल्या 1 हजार 920 काचेच्या सिलबंद बाटल्या, 10 हजारांचे बुच पॅक करण्याचे एक लोखंडी मशीन व त्या खाली बाटली ठेवण्यासाठी स्टँड व 720 रूपये किंममीचे दोन प्लॉस्टीक ड्रम, एक नरसाळे, 70 लीटर स्पिरीट त्यात काचेचे अल्कोहोल मीटर, पांढर्‍या रंगाचे माप, बारीक नळी प्लॉस्टीकची बादली असा एकुण 1 लाख 52 हजार 120 रुपये किंमतींचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

पोहेकॉ जाकिरोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन संशयीतावर भादंवि कलम 328, 468, 486, 488, 420 सह महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई भिकाजी पाटील करत आहेत.

पथकात यांचा समावेश

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई भिकाजी पाटील, पोहेकॉ जाकिरोद्दीन शेख, पवन गवळी, पोना आरीफ पठाण, संदिप ठाकरे, पोकॉ मनोज नेरकर, मनोज पाटील, संतोष पाटील यांच्या पथकाने केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...