Friday, June 21, 2024
Homeक्राईमNashik Crime News : नाशकात पुन्हा सापडल्या बनावट नोटा; दोन महिला ताब्यात

Nashik Crime News : नाशकात पुन्हा सापडल्या बनावट नोटा; दोन महिला ताब्यात

गुंडाविरोधी पथकाची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिकरोड (Nashik Road) येथील मुक्तिधाम जवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह (Fake Notes) दोन महिलांना (Woman) सापळा रचून अटक करण्यात आली. शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. उपनगर पोलिसात (Upnagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अंबड पोलिसांनी (Ambad Police) बनावट नोटांसंदर्भात कारवाई केल्याने, शहरात बनावट नोटा बनविण्याचे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वाती देविदास आहिरे (रा. सदगुरुनगर, दसक-पंचक, नाशिकरोड), पूजा अनिल कहाणे (रा. केरु पाटीलनगर, जेलरोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार विजय सूर्यवंशी यांना मुक्तीधाम परिसरात (Muktidham Area) काही महिला बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाचे सहायक निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने मुक्तिधाम परिसरात सापळा रचला.

यावेळी संशयित पूजा ही महिला त्याठिकाणी आली असता, तिच्याकडे एक पिशवी होती. जरा वेळाने संशयित स्वाती त्याठिकाणी आली आणि तिने पूजा हिच्याकडून बनावट नोटा असलेली प्लॅस्टिकची पिशवी घेतली. त्यावेळी दबा धरून असलेल्या महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी दोघींना अटकाव करीत तिच्याकडून पिशवी घेतली. त्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. या नोटा चलनातील ५०० रुपयांच्या नोटांसारख्या होत्या. बनावट १० हजारांच्या नोटासह दोघींना पथकाने अटक करून उपनगर पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले.

दरम्यान, ही कारवाई गुन्हेशाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट दोनचे सहायक निरीक्षक सचिन जाधव, गुंडाविरोधी पथकाचे विजय सूर्यवंशी, डी.के. पवार, राजेश सावकार, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, नितीन गौतम, सूवर्णा गायकवाड, बाळू शेळके, प्रकाश भालेराव, शंकर काळे विलास गांगुर्डे यांच्या पथकाने केली. दरम्यान, या महिलांनी नोटा कुठून आणल्या याबाबत तपास सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या