Thursday, April 30, 2026
HomeनाशिकNashik News: जेजुरकर मळ्यात 'फेक' बिबट्या; आईसाठी बनविलेले 'फेक' फोटो व्हायरल, वनखात्यासह...

Nashik News: जेजुरकर मळ्यात ‘फेक’ बिबट्या; आईसाठी बनविलेले ‘फेक’ फोटो व्हायरल, वनखात्यासह सायबरने दिली समज

नाशिक | प्रतिनिधी
जेजुरकर मळा परिसरात खोडशाळपणातून अफवा आणि अख्खा परिसर हादरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडल्याचे गुरुवारी (दि. ८) समोर आले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे पसरलेल्या अफवेने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण केले. विशेष म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयात सायबर सिक्युरिटीचे धडे गिरविणाऱ्या या तरुणाने बिबट्याचे ‘एआय’ फोटो बनवून आईला पाठविले. ते पाहून गोंधळलेल्या व घाबरलेल्या आईने कोणतीही शहानिशा न करता ते सार्वत्रिक केले. त्यामुळे परिसरात बिबट्या आल्याच्या अफवेचे काहूर माजले.

सायबर पोलिसांसह वनखात्याच्या माहितीनुसार, संबंधित तरुणाची आई नातलगांना भेटण्यासाठी पुणे येथे गेली असताना, तिला धक्कादायक पण गंमतीशीर स्वरूपात घटना सांगण्यासाठी मुलाने बिबट्याचे एआयनिर्मित फोटो बनवून व्हॉट्सॲपवर पाठवले. हे फोटो वास्तवदर्शी असल्याने आईने ते खरे समजले. त्यानंतर तिने ‘सतर्कता’ म्हणून परिसरातील शेजारी, काही महिलांसह ओळखीच्या नागरिकांच्या ग्रुपमध्ये शेअर केले. काही वेळातच हे फोटो विविध व्हॉट्सॲप ग्रुप आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ‘बिबट्या आला रे आला, चला पळा’ अशा स्थिती निर्माण झाली. जेजुरकर मळा परिसरात याआधीही बिबट्याच्या हालचाली झाल्या असून हे फोटो व्हायरल होताच नागरिकांमध्ये भीती पसरली.

- Advertisement -

मुंबईत भाजप-शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने; भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देत शिंदेंना डिवचलं

दरम्यान, हे फोटो वनखात्यापर्यंत पोहोचताच तातडीने तपास सुरू करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ आणि अनिल आहिरराव यांच्या नेतृत्वाखाली वनपथकाने संपूर्ण परिसराची पाहणी केली. संभाव्य बिबट्याच्या हालचाली, पाऊलखुणा किंवा अन्य पुरावे शोधण्यात आले. मात्र, तपासादरम्यान कुठेही बिबट्या आढळून आला नाही. तांत्रिक तपासणीअंती संबंधित फोटो एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर वनपथकाने संशयित तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने हे फोटो बनावट असल्याची कबुली दिली आणि आईचे मनोरंजन करण्यासाठीच ते पाठवल्याचे सांगितले. मात्र, फोटो पुढे व्हायरल झाल्याने अनावश्यक भीती पसरल्याचे स्पष्ट झाले. तरुणाला सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे व अधिकाऱ्यांनी योग्य समज दिली.

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी;...

0
मुंबई | Mumbai विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (दि.३० एप्रिल) रोजी शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) दोन दिवसांपूर्वीच पाच...