Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत भाजप-शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने; भाजपच्या कार्यकर्त्यांनी '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा...

मुंबईत भाजप-शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने; भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देत शिंदेंना डिवचलं

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील मुलाखतीत एकनाथ शिंदे यांना आम्हाला नाराज करायचे नाही, ते नाराज झाले तर मग आम्ही मित्रपक्ष कसले? असे म्हणत एकनाथ शिंदे भाजपसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मात्र या वक्तव्याला २४ तासही उलटत नाही तोच मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती असताना मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापल्याचे दिसून आले.

मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे (शिंदे) कार्यकर्ते आमनेसामने आले, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी माईकवरुन ’50 खोके एकदम ओके’ घोषणा देण्यात सुरुवात केली. या वॉर्डात दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मात्र या घोषणाबाजीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

आतापर्यंत ठाकरे गट ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होते. मात्र, आपल्या मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच अशा घोषणा दिल्याने साहजिकच शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापल्याचे दिसून आले. या सगळ्या प्रकरणावर आता स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Malegaon Municipal Election: भाजपच्या दोघा माजी शहराध्यक्षांना बंडखोरी भोवली; वरिष्ठांच्या आदेशान्वये निलंबन

कुठल्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तर अशा घोषणा देण्याआधी एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारा, अशा घोषणा देणारे आज कुठे गेले ते एकदा तपासा, असा टोला मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला. दरम्यान, चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकर अशी मैत्रिपूर्ण लढत आहे. विशेष म्हणजे त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. त्यामुळे या वॉर्डात शिवसेना (शिंदे) विरुद्ध भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मात्र आता प्रचारात या मैत्रीपूर्ण लढतीचे चित्र समोर आले.

आमच्या तोंडातून थोडासा चुकीचा शब्द निघाला. त्यांनी जी प्रॉपर्टी जाहीर केली आहे त्यानुसार ५० खोके नाही तर ‘अकरा खोके एकदम ओके’, अशी घोषणा द्यायला हवी. त्याची जंगम प्रॉपर्टी ११ कोटी आली कुठून?? त्यामुळे आम्ही नवी घोषणा सुरू केली आहे. ही घोषणा फक्त आमचे मित्र रामदास कांबळे आणि त्यांच्या उमेदवार पत्नी यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी वैयक्तिक घोषणा आहे, त्यांच्या पक्षासाठी ही घोषणा नाही. ही लढाई होणारच आहे. कारण माझी तिकीट त्याने चोरले आणि लोकांना दाखवले की त्याचे तिकीट मी चोरले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून त्याने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकीट घेतले, असे दत्ता केळुस्कर यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...