Friday, May 3, 2024
Homeनगररस्त्यात पडलेले झाड कधी काढणार?

रस्त्यात पडलेले झाड कधी काढणार?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गत दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे अनेेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.चांगदेवनगरकरांसाठी दळण-वळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा चांगदेवनगर ते गणपती फाटा रस्ता हा नेहमी गजबजलेला असतो. वादळी पावसामुळे या रस्त्यावर गल्या तीन दिवसांपासून बाभळीचे झाड उन्मळून पडले आहे. ग्रामपंचायत प्रशासनानेही याची गांभिर्याने दखल घेतलेली नाही.

- Advertisement -

दरम्यान चांगदेवनगरला जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग असून रस्त्यात पडलेल्या सदर झाडामुळे सुमारे 5ते 6 किमी अंतर वाढते प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असून या प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करीत आहे. रात्री अपरात्री या झाडामुळे अपघात घडण्याची शक्यता असून ग्रामपंचायतीने सदर झाड रस्त्यातून त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

सदर रस्त्याबाबत तक्रार करुनही या प्रश्नाकडे डोळेझाक केली जात आहे. दोन दिवसांत शेतकर्‍यांची व प्रवाशांची हेळसांड न थांबवण्यासाठी हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा.

– प्रसाद सांबारे, शेतकरी चांगदेवनगर

- Advertisment -

ताज्या बातम्या