प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी जगाला निरोप घेतला आहे. हृदय विकारामुळे सरोज खान यांचा मृत्यू रात्री दीड वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरात झाला आहे.
सरोज खान यांच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमधील कलाकारांना धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या करीयर मध्ये आता पर्यंत २००० पेक्षा जास्त गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आता पर्यंत तीन वेळेस राष्ट्रीय पुरस्कार देखील भेटले आहे.
सरोज खान यांना श्रद्धांजली वाहताना अक्षय कुमारने ट्विट मध्ये म्हंटले आहे, “माझी सकाळ सरोज खान यांच्या सारख्या महान नृत्यदिग्दर्शक यांच्या मृत्युने झाली. त्या नृत्य इतक्या सोप्या पद्धतीने शिकवायच्या की कोणीही नाचू शकत होते. त्यांच्या जाण्याने उद्योगाला मोठा फटाका बसला आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो !”
तसेच रितेश देशमुख याने देखील ट्विट करत म्हंटले आहे, “सरोजजी तुमच्या आत्म्यास शांती मिळो. हे नुकसान चित्रपट उद्योगासाठी आणि चित्रपट प्रेक्षकांसाठी अकल्पनीय आहे. अल्लाउद्दीन या चित्रपटात त्यांच्या द्वारे नृत्य शिकण्याचे सुख लाभले आहे.”