Sunday, September 15, 2024
Homeनगरकर्जाला कंटाळून शेतमजुराची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतमजुराची आत्महत्या

आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल || कोपरगावातील धारणगाव कुंभारीची घटना

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी येथे एका शेतमजुराने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ काढून नंतर विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण उडाली आहे.

22 मे रोजी धारणगाव कुंभारी येथील हिंगणी बंधारा जवळील विहिरीत सोमनाथ खंडू कदम (वय 43 वर्षे, रा. धारणगाव कुंभारी, ता. कोपरगाव) येथील शेतमजुराने कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ काढून नंतर विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता गावकरी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मयत सोमनाथ खंडू कदम यांचा मृतदेह विहिरीतून अथक प्रयत्नाने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या