Friday, May 3, 2024
Homeजळगावbreaking news आमोदा येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

breaking news आमोदा येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

फैजपूर – प्रतिनिधी – Faizpur

आमोदा ता.यावल (yaval) येथील रहिवासी शेतकरी (farmer) शेतात काम करीत असताना आज दि.3 रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून जागीच ठार झाला.

- Advertisement -

आमोदा येथील रहिवासी ज्ञानदेव धनु चौधरी शेतकरी आपल्या खाजगी गट नं 1185 शेतात आमोदा शिवारात (बकाने) पिकाची मशागत करत असताना अचानक ढगांचा व विजांचा कडकडाट होऊन एक ते दोन च्या सुमारास अंगावर वीज पडून जागीच ठार झाला.

या घटनेची फैजपूर पोलीस स्टेशनला (Faizpur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सानप यांनी पंचनामा केला शेतकऱ्याला व कुटुंबाला आर्थिक आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या