Saturday, July 27, 2024
Homeनगरखरेदी केंद्रावर फक्त शेतकर्‍यांचाच कांदा स्विकारावा- खा. लोखंडे

खरेदी केंद्रावर फक्त शेतकर्‍यांचाच कांदा स्विकारावा- खा. लोखंडे

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्का मध्ये 40 टक्के वाढ करणे हे सरकारचे चूकीचे धोरण आहे. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करु नये. शासनाने सुरु केलेल्या कांदा खरेदी केंद्रावर फक्त शेतकर्‍यांचाच कांदा खरेदी केला पाहिजे, असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.

- Advertisement -

देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित आढावा बैठकीत खा.लोखंडे बोलत होते. या वेळी माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुरलीधर कदम, साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनिल कराळे, जिल्हा प्रमुख आण्णासाहेब म्हसे, संपतराव जाधव, बापुसाहेब शिंदे, दिपक त्रिभुवन, सतिश वाळूंज, मच्छिंद्र कदम, गोरख चव्हाण, प्रभारी मुख्याधिकारी आहेर, अधिक्षक सुदर्शन जवकउपस्थित होते.

खा. लोखंडे यांनी खासदार निधीतून देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरीसाठी एक कोटी रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे व देवळाली प्रवरासाठी दोन कोटी रुपयांचा संगीत कारंजासाठी निधी दिला. संगीत कारंजा व सीसीटीव्ही कॅमेरे कुठे बसवयाचे या बाबत चर्चा केली. यावेळी शिवाजीराव कपाळे व सुनिल कराळे यांनी देवळाली प्रवरासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरु करण्याची मागणी केली. त्यास त्यांनी साकारात्मक प्रतिसाद दिला. संपतराव जाधव व बापूसाहेब शिंदे यांनी चोथे वस्ती ते टाकळीमिया रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली ही मागणी ही तात्काळ मान्य करण्यात आली. तसेच नगरपरिषद हद्दीत प्राथमिक शाळाची पट संख्या व अडचणी उपस्थित मुख्याध्यापकांकडून जाणून घेतल्या.

कांदा प्रश्नावर बोलतांना खा.लोखंडे म्हणाले, कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावणे हे केंद्र सरकारचे चुकीचे धोरण आहे. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे 2410 रुपये प्रति क्विंटलने कांदा खरेदी सुरु झाली आहे. राहुरी तालुक्यासाठी देवळाली प्रवरा व मांजरी येथे कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

बैठकीस मुख्याध्यापक, मुख्यध्यापिका, शासकीय अधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

2005 साली समन्यायी पाणी वाटप कायद्याला तत्कालीन लोकप्रतिनिधींनी विरोध न केल्याने जायकवाडीची टांगती तलवार कायम आहे. यासाठी घाटमाथ्यावरील वाहून जाणारे 115 टीएमसी पाणी वळविल्याशिवाय पर्याय नाही. तरच 9 तालुक्यातील जनतेला न्याय मिळेल

– खा. सदाशिव लोेखडे

- Advertisment -

ताज्या बातम्या