Tuesday, January 27, 2026
HomeनगरFarmer Suicide Pathardi : सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी

Farmer Suicide Pathardi : सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी

पाथर्डी (प्रतिनिधी)

पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी येथील गरडवस्तीवरील रहिवाशी बाबासाहेब नामदेव धायतडक (वय ४६) यांनी सावकाराच्या मानसिक छळाला कंटाळून गुरुवारी (दि.१२) आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मयत बाबासाहेब धायतडक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बाळासाहेब बबन गर्जे (रा. अकोला, ता. पाथर्डी) याने वेळोवेळी दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे.

- Advertisement -

मयत बाबासाहेब धायतडक यांचा मुलगा सचिन बाबासाहेब घायतडक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, त्यांच्या वडिलांनी एक वर्षांपूर्वी म्हशी घेण्यासाठी बाळासाहेब बबन गर्जे याच्याकडून १० टक्के व्याज दराने ६ लाख रुपये घेतले होते. त्यापैकी ५ लाख रुपये त्यांनी व्याजासह परत केले होते. मात्र तरीही बाळासाहेब बबन गर्जे यांनी आणखी ५ लाख रुपयांची अवास्तव मागणी करत सातत्याने धमकी देण्यास सुरुवात केली.

YouTube video player

११ जून रोजी गर्जे यांनी सार्वजनिकरित्या वडिलांना अपमानित करत शिवीगाळ केली व पैसे दे नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर कर अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १२ जून २०२५ रोजी सकाळी बाळासाहेब बबन गर्जे याचा पुन्हा फोन आला आणि पाथर्डी येथील कोरडगाव चौकात येण्यास सांगितले. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या बाबासाहेब धायतडक यांनी सकाळी ९.३० वाजता घरातून निघून आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी गावातील व्यक्तींना व्हॉट्सपवर एक चिठ्ठी पाठवली होती, ज्यात बाळासाहेब बबन गर्जे यांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करीत आहे असे लिहिले होते. ‘बाळासाहेब आज दहा वाजता पाथर्डी कोरडगाव चौकात हाणार होता (मारहाण करणार होता), म्हणून आत्महत्या करीत आहे असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

गुरुवारी सायंकाळी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानंतर बाळासाहेब बबन गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात बाबासाहेब धायतडक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, एक विवाहीत आणि अविवाहित मुलगी तसेच दोन अविवाहीत मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...