Wednesday, January 7, 2026
Homeनगरकंगना रणौतचे शेतकरी आंदोलनाविषयी वादग्रस्त वक्तव्य; अजित नवले म्हणाले…

कंगना रणौतचे शेतकरी आंदोलनाविषयी वादग्रस्त वक्तव्य; अजित नवले म्हणाले…

अकोले । प्रतिनीधी

नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) महिलांवर अत्याचार आणि अनेक हत्या झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.अखिल भारतीय किसान सभेनं कंगनाच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.

- Advertisement -

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाले. हे आंदोलन चीनने घडवून आणले होते व या आंदोलनाच्या आडून देशात बांगलादेश घडवण्याचे षड्यंत्र होते अशा प्रकारचे अत्यंत बेताल वक्तव्य कंगना रणौत यांनी केले आहे. त्या वादग्रस्त वक्तव्याचा अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अजित नवले यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

YouTube video player

हे हि वाचा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिली थेट तिसऱ्या आघाडीसाठी ऑफर

संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 600 पेक्षा जास्त शेतकरी शहिदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो हजारो शेतकरी माता भगिनींचा व देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा हा घोर अपमान आहे. कंगना रणौत यांनी यापूर्वी सुद्धा शेतकरी आंदोलनाबद्दल अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केली आहेत.

स्वातंत्र्य संग्रामाबद्दल सुद्धा अशाच प्रकारची बेताल वक्तव्य यापूर्वी त्यांच्याकडून करण्यात आली आहेत. कंगना रणौत करत असलेली वक्तव्य या देशातील स्वातंत्र्य युद्ध आणि या देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे. या षडयंत्रामागे असणाऱ्या शक्तींचा देशभरातील शेतकरी, शेतकऱ्यांची पोरं आणि या देशावर प्रेम करणारे नागरिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे डॉ नवले यांनी म्हंटले आहे.

हे हि वाचा : बिबट्याने शेळी, कुत्रा अन् कोंबडीचा पाडला फडशा ग्रामस्थांनी भांडे वाजवून पिटाळले

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...