Monday, May 27, 2024
Homeनाशिकयेवला तालुक्यात पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

येवला तालुक्यात पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

ममदापूर | वार्ताहर

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पावसाने हजेरी लावली तरी पण जोरदार पावसाची प्रतीक्षा चालू वर्षी पावसाचे साडेतीन-चार महिने संपत आल्यानंतर अखेरीस गणेश उत्सव परवा काळात येवला तालुक्यात ठीक ठिकाणी दमदार ते मध्यम हजेरी लावत आहे पावसाने गेल्या दोन-तीन दिवसापासून ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. दुपारनंतर जोरदार हजेरी लावत पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला सुखद धक्का दिला असून यंदा पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावण्याची चर्चा होत आहे.

- Advertisement -

या पावसाने चांगला जोर धरल्यास रब्बी पिकांचे भविष्य सुखद ठरणार आहे खरीप वाया गेल्याने या पावसावर आगामी रब्बी हंगामातील पिकांच्या अशा पल्लवीत झाले आहे. या पावसाने तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील ममदापूर देवदरी खरवंडी सह परिसरात मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप आहे. ठिकठिकाणी जोरदार बरसलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले, तर अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले.

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने विहिरी नदी नाले कोरडे टाक पडलेले आहे आणि रब्बी हंगामातील पिकांच्या अशा मावळ्यात जमा होत्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याविना जळून गेले आहे. तरी जी पिके थोडीफार तक धरून होती त्यांना मात्र पावसामुळे दिलासा मिळणार आहे. बरसलेल्या पावसामुळे शेतकरी व्यवसायिक शेतमजूर यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान दिसून आले.

पावसाने अजून काही दिवस जोर धरल्यास रब्बी हंगाम यशस्वी होण्याला मदत होणार आहे हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आणखी काही दिवस असाच जोरदार पाऊस बरसला तर पाणीटंचाईचे संकट पूर्ण पणे दुर होण्यास मदत होईल. साडेतीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पडता झाल्याने बळीराजाची चिंता काहीशी कमी होऊन चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. विहिरींना पाणी उतरावे नदी नाले ओसंडून व्हावे यासाठी पावसाने आणखी काही दिवस जोरदार हजेरी लावावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात अनेक ठिकठिकाणी दमदार हजेरी लावत आहे, परंतु उत्तर पूर्व भागातील ममदापूर देवदरी खरवंडी परिसरात मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. विहिरी तलाव शेततळे बोरवेल कोरडे टाक पडले आहे पावसाने जोर धरून विहिरींना पाणी उतराव नदी ओढून आले ओसाण दोन व्हावे खरीप पूर्णपणे वाया गेला आहे आता सर्व अशा रब्बी हंगामावर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या