Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : पिकांना खते देण्याची लगबग

Nashik News : पिकांना खते देण्याची लगबग

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) बोरगाव घाटमाथा (Borgaon Ghatmatha) परिसरात भात, नागली, वरई आदी पिकांसाठी युरीया खते टाकण्यासाठी शेतकरी वर्गांची लगबग सुरु झाली आहे. बोरगाव ही घाटमाथ्यावर भागातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.

- Advertisement -

हे ठिकाण मोठे व्यापारी वर्ग नोकरदार, कृषी सेवा केंद्र, दुकाने मात्र दुकानांमध्ये माल असुन सुद्धा शेतकरी (Farmer) वर्गाला दिला जात नाही. उलट सांगता कि आमच्याकडे खतंच शिल्लक नाही आणि काही शेतकर्‍यांना हळुच सांगता आहे, पण मात्र ३२०, ३५०, ४००,पर्यत चढ्या भावाने विक्री केली जाते. नाहीतर तुम्हाला जड खत आणि युरीया मिळेल अशी ग्रामस्थांकडून व शेतकरी वर्गाकडून लुट केली जात आहे.

युरीया बाजारभाव २६४, २८४ असे दर असून सुद्धा लुट केली जात आहे. दुकानदारकडे कृषी अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नसल्याने हे सर्व प्रकार घडत आहे असेच म्हणावे लागेल ? बोरगाव हा ठिकाणी खत मिळते नसल्याने थेट वरखेडा, कनाशी, अभोणा, कळवण हा ठिकाणी सुरगाणा तालुक्यातील शेतकरी जाऊन घेऊन येतात.

खतांच्या (Fertilizers) तुटवडा निर्माण झाला आहे की जाणून बुजून केले जाते. सुरगाणा तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग हे वरच्या पावसावर अवलंबून असुन त्याचे प्रमुख पिके, नागली वरई, भात कुळीद, उडीद हे असुन पावसाने थोडाफार प्रमाणात उघडझाप दिल्याने शेतकरी वर्ग खंत टाकण्यासाठी मोठी धावपळ करत आहेत, मात्र खत मिळत नसल्याने शेतकर्‍यांना महागडी खते घेऊन आपल्या पिके जगविण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या