शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
महायुती सरकारने शेतकर्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिलेे. मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचे दिसून येत आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकरी कर्ज माफीबाबत विचारले असता त्यांनी अजून पाच वर्षे जायची आहेत. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही असे म्हणत शेतकरी कर्जमाफीबाबत उदासिनता दाखविली. त्यामुळे शेतकर्यांना खरेच कर्जमाफी होणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प शिबीर शिर्डीत पार पडले. शिबिराला उपस्थित असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना माध्यमांनी शेतकरी कर्जमाफीबाबत विचारले असता ते पत्रकारांवर चांगलेच भडकले.
महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. अजून कुठे पाच वर्ष पूर्ण झाली. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही. असे म्हणून कर्जमाफीच्या प्रश्नावर उदासिनता व्यक्त केली. त्यामुळे महायुती सरकार शेतकर्यांना कर्जमाफी देणार का? यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्याचे कृषीमंत्रीच शेतकर्यांचा कर्जमाफीचा प्रश्न आपल्या अखत्यारीत नसल्याचे म्हणतात. यावरून शेतकर्यांनी काय बोध घ्यावा. शिबिरात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले निवडणूक काळात पक्षाच्या अजेंड्यात काही विषय घ्यावे लागतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफी हा विषय निवडणूक अजेंडा तर नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.