Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : खरीप हंगामात शेतकरी चिंताग्रस्त; रासायनिक खतांची टंचाई

Nashik News : खरीप हंगामात शेतकरी चिंताग्रस्त; रासायनिक खतांची टंचाई

ओझे | विलास ढाकणे |Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या एक महिन्यापासून महत्वाच्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाल्यामुळे पिकांना (Crops) पाहिजे त्या खतांची उपलब्धता होत नसल्यामुळे खरीपाच्या हंगामातील उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील कृषी विभागाने रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे…

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) जोरात सुरु झाला असून सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर भाताची (Rice) आवणी अंतिम टप्यात असून सध्या मका, उडीद, मुगं या पिकांच्या वाढीसाठी युरिया खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. सध्याच्या खरीप हंगामात शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची पेरणी करतात.

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे (Rain) प्रमाण मध्यम स्वरूपाचे असल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी युरिया खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. मात्र, सध्या कृषी केंद्रामध्ये युरिया खताची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून सांगितली जात आहे.

प्रत्येक हंगामात सतत रासायनिक खताची टंचाई निर्माण होत असल्यामुळे शेतकरी अपेक्षित उत्पादन घेवून शकत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे, मात्र महाराष्ट्राचा कृषी विभाग शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामाला विशेष महत्त्व दिले जाते. शेतकरी वर्गाची संपूर्ण भिस्त खरीप हंगामावर अवलबूंन असते. मात्र, सततच्या रासायनिक खत (Chemical Fertilizers) टंचाईमुळे शेतकरी हतबल होतांना दिसत आहे.

Devendra Fadnavis : “या भेटीबाबत मला…”; शरद पवार-अजित पवारांच्या गुप्त भेटीवर फडणवीस स्पष्टच बोलले

खत कंपन्याकडूनच होते लिकिंग

सर्वत्र रासायनिक खताची टंचाई निर्माण होत असताना खत कंपन्या रासायनिक खतावर इतर लिक्विड खते कृषी केंद्राना घेण्याची सक्ती करत आहे. मात्र, शेतकरी लिकिंग खते घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे कृषी केंद्रामध्ये शेतकरी व दुकानदार असा संघर्ष कायम पाहण्यात मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हे खत कंपन्याचे रासायनिक खतावरील लिकिंग कायमस्वरूपी बंद केले पाहिजे, यामुळे दुकानदार बदनाम होतो. तर शेतकऱ्यांच्या लिक्विड, खत किंवा अन्य औषधे कारण नसताना माथी मारले जात आहेत. अनेकवेळा या लिकिंगवर आवाज उठवूनही लिकिंग बंद होत नाही. यात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे फार मोठे अपयश म्हणावे लागेल. सध्या दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला असून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसावरच पिकांची वाढ होणे खूप महत्वाचे आहे. यासाठी जिल्हा कृषी विभाग आणि तालुका कृषी विभागाने युरिपा खताची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Shirdi : सलग सुट्ट्यांमुळे दुमदुमली शिर्डी, साईंच्या दरबारी भाविकांची तुफान गर्दी

दिंडोरी तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी आहे त्या पाण्यावर खरीप हंगामातील सर्व पिकांची वाढ होण्यासाठी युरियासह सर्व दाणेदार रासायनिक खतांची उपलब्धता कृषी विभागाने करून देण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या खरीप हंगामात बळीराजाने मोठ्या प्रमाणात टोमॅटो, कोबी,फ्लावर, घेवडा, चवळी, दुधी भोपळा, कारले,दोडका, वांगी, भेडीसह सर्वच भाजीपाला पिकाची लागवड केली असून या पिकांसाठी रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यासाठी कृषी विभागाने युरियासह सर्व रासायनिक खते उपलब्ध करून दयावे.

गणेश बोडके, शेतकरी, ढकांबे

- Advertisment -

ताज्या बातम्या