Thursday, April 3, 2025
Homeधुळेपळासनेरनजीक भीषण अपघात, 12 जण ठार, 24 जखमी

पळासनेरनजीक भीषण अपघात, 12 जण ठार, 24 जखमी

धुळे Dhule प्रतिनिधी –

मुंबई -आग्रा राष्टीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पळासनेरनजीक आज भीषण अपघात झाला. खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकी, कारला उडवत थेट हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात 12 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. जे 09 जीबी 9001 क्रमांकाचा कंटेनर हा मध्यप्रदेश राज्यातून खडी घेऊन जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसी येथे येत होता. पळासनेर गावानजीक अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचा कंटेनर वरील ताबा सुटला. त्यानंतर कंटेनर रस्त्यावरील वाहनांना व नागरिकांना उडवीत थेट हॉटेलमध्ये शिरून उलटला. या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तात्काळ जवळील व शिरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अहिल्यानगरच्या विठ्ठल-रूक्मिणी पतसंस्थेमध्ये 79 लाखांचा अपहार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 79 लाख रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला असून, संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन,...