मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघातांची मालिका सुरूच आहे. काल सायंकाळी स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात (Accident) झाला होता. त्यानंतर आता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा (Truck) भीषण अपघात झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगरजवळील (Chhatrapati Sambhajinagar) फतियाबाद परिसरात (Fatiabad Area) हा भीषण अपघात झाला असून केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला.
संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात
पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग (Fire) लागल्याने आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. तर या अपघातात ट्रकमधील ड्रायव्हरचा मृत्यू (Death)झाल्याचे समजते. तसेच या अपघातात ट्रकमध्ये किती जण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
कसब्याच्या निकालावर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये…”
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांसह (Police) अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, केमिकल ट्रक (Chemical Truck) असल्यामुळे वेळेवर आग विझविण्यात अग्निशमन दलाला अपयश येत होते. अखेर औरंगाबाद येथील महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) वाहनाने आग आटोक्यात आणली.