Tuesday, June 25, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Accident News : एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; चार जणांचा...

Nashik Accident News : एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

नाशिक | Nashik

- Advertisement -

चांदवड येथील राहुड घाटात एसटी बस ट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात चार ठार तर, 35 प्रवासी जखमी झाले.

मुंबई -आग्रा महामार्गावरील राहुड घाटात आज सकाळी साडेनऊ वाजता एसटी बस व ट्रकमध्ये धडक झाल्याने भीषण अपघात घडला. अपघातात बसची डावी बाजू ट्रकला घासत गेल्याने बसचा भाग कापला. त्यातून प्रवाशांना दुखापत झाली. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना इतरत्र हलविण्यात आले.

पालघर विभागातील (एमएच14/क्यू/3631) जळगावहून वसईकडे जात असताना चांदवड येथील ग्रीन व्ह्यू जवळून जाणार्‍या ट्रकला घासत चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या अपघातात खालिदा गुलाम हुसेन ( वय. 60) रा. भोईवाडा ठाणे,सुरेश तुकाराम सांवत (वय 28 ) डोंगरगाव, ता. देवळा,साई संजय देवरे ( वय 14 ) उमराणे ,बळीराम सोनू आहिरे ( वय 64 ) नाशिक हे चार प्रवाशी मृत पावले. बसमध्ये जवळपास 45 प्रवासी असल्याने जखमी तसेच इतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

- Advertisment -

ताज्या बातम्या