Friday, May 3, 2024
Homeनाशिकउपासना सुरु असतानाच फादरचा जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न

उपासना सुरु असतानाच फादरचा जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेनरोड, शालीमार भागातील चर्चमध्ये फादर अनंत आपटे (Anant Apte) यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने चर्चसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. रविवारची उपासना चालू असताना ही धक्कादायक घटना आहे…

- Advertisement -

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चर्च कमिटीने फादर यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यात चर्च कमिटीमध्ये मतभेद झाले असल्याने फादर अनंत आपटे यांनी पेट्रोल टाकून चर्चमध्येच आत्महत्याचा प्रयत्न (Attempted suicide) केला.

कमिटीने बाजू मांडू न दिल्याने आपटे हे प्रचंड मानसिक तणावाखाली आले. त्यामुळेच त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा चर्चसह परिसरात केली जात आहे. आपटे यांनी शालिमार येथील सेंट थॉमस चर्च येथे महाधर्मगुरु शरद गायकवाड (Sharad Gaikwad) यांच्यासमोरच आत्महत्याचा प्रयत्न केला.

उपचारासाठी आपटे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत ते १८ टक्के भाजल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या