नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
गेल्या वर्षी सामाईक शेती वाटपाच्या कारणावरुन खोर्याने मारहाण (Beating) करुन वडिलांना जखमी (Father Injured) केल्याच्या घटनेतील आरोपी मुलास नेवासा (Newasa) येथील न्यायालयाने 4 वर्षांचा कारावास व 6 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत माहिती अशी की, शिरसगाव येथील किसन दादा चोपडे (फिर्यादी) यांचे शिरसगाव शिवारातील शेती गट क्र.59 मधील पत्रा शेडमध्ये 1 फेब्रुवारी 2024 रोजी सामाईक शेती वाटपाच्या कारणावरून आरोपी ज्ञानेश्वर किसन चोपडे याने फिर्यादीस लाथा बुक्क्याने मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व खाली पाडून खोर्याने कपाळावर मारहाण करून गंभीर जखमी (Injured) केले व गुन्ह्यात वापरलेले खोरे हे पाण्याने धुऊन काढले व पुरावा नष्ट केला होता.
विशेष सहायक सरकारी अभियोक्ता एस.एच. चव्हाण यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. व्ही. जाधव यांनी आरोपीस भारतीय दंड विधान कलम 326, 201 या गुन्ह्यासाठी दोषी धरले. कलम 326 या गुन्ह्यासाठी तीन वर्षाचा सश्रम कारावास व दंड 5000 हजार रुपये तर कलम 201 या गुन्ह्यासाठी एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड (Penalty) अशी शिक्षा (Punishment) ठोठावण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अशोक कुदळे यांनी केला. अभियोग पक्षाचे वतीने विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. एच. चव्हाण यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी हवालदार राजू शंकर काळे यांनी सहकार्य केले