Tuesday, July 16, 2024
Homeनाशिकस्वयंसेवकांचा आज सन्मान

स्वयंसेवकांचा आज सन्मान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (94th All India Marathi Literary Convention ) यशस्वीतेसाठी योगदान देणार्‍या स्वयंसेवकांचा रविवारी दि. 27 मार्च रोजी, सायंकाळी 5 वा., विश्वास बँक डिझास्टर मॅनेजमेंट हॉल, सावरकर नगर येथे प्रमाणपत्र वाटप व सत्कार समारंभाचे (felicitation ceremony of volunteers )आयोजन करण्यात आले आहे.

आयोजकांतर्फे योगदान देणार्‍या सर्व स्वयंसेवकांचा उचित सन्मान करण्याचा मनोदय होता, परंतु संमेलनानंतर आलेल्या करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या सावटाखाली ते शक्य झाले नाही, शासनाच्या निर्बंधामुळे स्वयंसेवकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात बंधने येत होती.

सध्या करोनाचा प्रभाव कमी झालेला असता साहित्य संमेलनातर्फेे कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. कार्यक्रमास सर्वसमिती प्रमुख विश्वास ठाकूर, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कार्यवाहक संजय करंजकर, विनायक रानडे, रमेश अय्यर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

स्वयंसेवकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समिती पालक रमेश देशमुख, समिती प्रमुख डॉ. संतोष मोरे, भूषण काळे, वेदांशू पाटील, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या