Friday, September 11, 2026
Homeक्राईमNashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा गंडा,...

Nashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा गंडा, खंडणीसाठी टिप्पर गँगशी हातमिळवणी

नाशिक | प्रतिनिधी
आर्थिक फसवणूक व्यवहारातून आणि त्यानंतर पोलिसांत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका हायप्रोफाईल महिलेचा पराक्रम उघडकीस आला आहे. स्वतःचे अडकलेले पैसे मागणाऱ्या ५६ वर्षीय सीएला वठणीवर आणण्यासाठी या महिलेने शहरातील कुख्यात टिप्पर गँगच्या म्होरक्याची मदत घेत चाकूच्या धाकावर पुन्हा ५ लाखांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया जयप्रकाश सेन (रा. पाथर्डी फाटा) असे या संशयित महिलेचे नाव असून, तिने कालिका अपार्टमेंट येथील रहिवासी असलेले सीए राजेश सत्यनारायण चांद यांच्याकडून २०१९ पासून टप्याटप्प्याने सुमारे ९ लाख ९७ हजार रुपये उकळले होते. चांद यांनी ही रक्कम परत मागितल्यावर महिलेने नमते न घेता, २२ गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेला सराईत गुन्हेगार समीर पठाण याच्याशी हातमिळवणी केली. पैसे परत मागताच समीर पठाण याने चांद यांना खोट्या तक्रारीत अडकवण्याची धमकी देत शिवीगाळ व मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून सुरुवातीला एक लाख रुपये उकळले. यानंतरही या दोघांची हिम्मत वाढली.. बुधवारी (दि. ०९) दुपारी थेट चांद यांच्या कार्यालयात शिरुन पुन्हा ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास दुसऱ्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत त्यांनी आणखी एक लाख रुपये जबरीने वसूल केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

- Advertisement -

तुकाराम मुंढेना MPSC आयोगाच्या अध्यपदी नियुक्त करा, रोहित पवारांची मागणी

कुख्यात बनला ढाल
संशयित छाया सेन हिने आर्थिक फसवणुकीवर पडदा टाकण्यासाठी शहरात खून, दरोडे, जबरी चोरी आणि हद्दपारीचे आदेश मोडून फिरणाऱ्या समीर पठाण याच्या गुन्हेगारी नेटवर्कचा ढालसारखा वापर केल्याचे उघड झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मुंबई नाका पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीसह शस्त्र कायद्यान्वये (आर्म्स अॅक्ट) गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक पंडित पवार पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

अभियोगपूर्व

Nashik ACB News: एसीबीचा दणका, शासनाचा ब्रेक ! ४३५ अभियोगपूर्व प्रकरणे...

0
नाशिक | भारत पगारेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) (Anti Corruption Beuro) लाचखोर अधिकारी (Corrupt Officer) आणि कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केली असली, तरी पुढे...