मुकटी, जि.धुळे – वार्ताहर
शहरातील नगावबारी येथील बाफना हॉस्पिटल या कोविड केअर सेंटर मधून काल दुपारी व सायंकाळी पंधरा रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यात मुकटी व हेंकळवाडीतील रुग्णांचा समावेश आहे.
- Advertisement -
याबाबत कोविड केअर सेंटरच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पश्चिम देवपूर पोलिसात तक्रार दिली आहे.
नगावबारी येथील कोविड केअर सेंटरमधून काल दि.4 रोजी दुपारी तीन वाजता मुकटी येथील 3 जण व हेंकळवाडीतील 7 जण तसेच सायंकाळी साडेसात वाजता मुकटीतील आणखी 5 जण असे 15 जण पळून गेले.