Sunday, May 5, 2024
Homeजळगावजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातू फाईल गहाळ !

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातू फाईल गहाळ !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून फाईल गहाळ झाल्याचा प्रश्न जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

फाईल फक्त पैशांसाठी फिरते, अशी पुष्टी सदस्य अमित देशमुख यांनी जोडली. कोविडच्या काळात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी चांगले काम केले. त्यांची फाईल मंजूर होण्याऐवजी गायब होण्याचा प्रकार गंभीर आहे.

या प्रकरणीची जि.प.सीईओंनी दखल घ्यावी,अशी मागणी सदस्य प्रभाकर सोनवणे यांनीही लावून धरली. त्यामुळे आरोग्य विभागही चांगलाच गाजला.

ग्रा.पं उपमुख्यकार्यकारी अधिकारी बोटेंवर तक्रारींचा पाऊस

ग्रामपंचायती विभागातील कामकाजाविषयी तक्रारींचा निपटरा होत नसून उलट निलंबित ग्रामसेवकाला नोकरी कायमसेवत कसे घेण्यात आले? तसेच विठ्ठल मंदिर पाणीप्रश्नावरुन वारकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ग्रा.पं उपमुख्यकार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांना सदस्य गजेंद्र सोनवणे यांनी धारेवर धरले.

त्यानंतर नंदकिशोर महाजन यांनी बोटे यांना कार्यमुक्त करण्याची मागणी लावून धरली. तसेच आरोग्य विभागातील पदोन्नती व आरोग्य कर्मचार्‍यांच्या फाईलींवरुन सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.त्यावर नानाभाऊ महाजन म्हणाले की कोणाकोणाला कार्यमुक्त करणार असा सवाल उपस्थित केला.

गौणखनिज चौकशीवरुन अधिकारी निरुत्तर

जिल्ह्यातील गौणखनिज प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असताना चौकशी समितीने मात्र,गुळगुळीत अहवाल तयार करुन चुकीच्या पद्धतीने सभागृहाला माहिती देत असल्यावरुन जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी चौकशी समितीचे प्रमुख वैभव शिंदे यांना जाब विचारला.मात्र, त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.

विरोधकांचा बहिष्कार ठरला फुसका बार

यापूर्वी जि.प.च्या ऑनलाईन सभेत शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला होता.मात्र, शुक्रवारी झालेल्या सभेत विरोधक अनुमोदक व सूचक झाल्याने शिवसेनेचे सदस्य गोपाळ चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला.विरोधकांनी सत्ताधार्‍यांशी जुळवून घेतल्याचा आरोप झाला. मात्र, गटनेते रावसाहेब पाटील, नानाभाऊ महजन यांनी याविषयीवर खंडन केले.

या सदस्यांनी घेतला सहभाग

भाजपचे गटनेते पोपटतात्या भोळे, जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन, मधुकर काटे, अमित देशमुख, गजेंद्र सोनवणे, पल्लवी सावकारे, शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, गोपाळ चौधरी, प्रतापराव पाटील, काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंके, प्रा.डॉ.निलम पाटील, प्रमिला पाटील, माधुरी अत्तरदे,बोदवड पं.स. सभापती किशोर गायकवाड, उपाध्यक्ष लालचंद पाटील आदी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या