Sunday, May 26, 2024
Homeधुळेविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासुसह तिघांवर गुन्हा

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासुसह तिघांवर गुन्हा

धुळे – प्रतिनिधी dhule

साक्री तालुक्यातील (Sakri taluka) सतमाने येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी (Suicide) तिच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भारती भाऊसाहेब सोनवणे (वय 24 रा.सतमाने) असे विवाहितेचे नाव आहे. तिच्यावर (Husband) पती भाऊसाहेब बापु सोनवणे, सासरे बापु सोनवणे व सासु मिराबाई बापु सोनवणे यांनी चारित्र्यावर संशय घेवून तिचा छळ केला. वारंवार शिवीगाळ करीत तिला जिवे मारण्याची धमकी दिली.

या त्रासाला कंटाळून तिने दि. 21 रोजी गाव शिवारातील बाभळाच्या झाडाला गळफास घेत (suicide) आत्महत्या केली. तिला वरील तिघांनी आत्महत्येस प्रवृत्त केले. अशी फिर्याद सुरेखाबाई नाना मालचे (वय 45 रा. बाजारपेठ भिलाटी, कुसुंबा) यांनी निजामपूर पोलिसात दिली आहे. पुढील तपास पीएसआय वसावे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या