Monday, May 27, 2024
Homeजळगावमहिलेच्या गळ्यातून मंगलपोत लांबविली

महिलेच्या गळ्यातून मंगलपोत लांबविली

जळगाव – jalgaon

शहरातील बेंडाळे नगरात घरासमोर उभ्या महिलेची गळ्यातुन २० ग्रॅमची मंगलपोत दोन स्टाईल लांबवल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात (District Police Thane) अज्ञात दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

प्रेमनगरात असलेल्या सप्तशृंगी माता मंदिराच्या मागे बेंडाळे नगरात प्रतिमा विवेक काटदरे वय ५२ या वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दूध घेण्यासाठी दुचाकीने गणेश कॉलनीत गेल्या. दूध घेऊन पुन्हा घरी परतल्या घराच्या गेटसमोर उभे असताना विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने काटदरे यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची वीस ग्रॅमची मंगळपोत तोडून नेली.

काही कळण्याच्या आत संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी प्रतिमा काटदरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. निळ्या रंगाचे शर्ट व कुरळे केस वय अंदाजे ४० असे मंगळपोत लांबविणार्याचे वर्णनही काटदरे यांनी पोलिसांना सांगितले आहे पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ महाजन हे करीत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या