Friday, May 3, 2024
Homeजळगावशिवाजी नगर हुडकोत दुचाकी जाळली

शिवाजी नगर हुडकोत दुचाकी जाळली

जळगाव – jalgaon

शहरातील (Shivajinagar) शिवाजीनगर हुडको परिसरातील व्यावसायिकाची दुचाकी (bike) जाळल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर (police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरातील निरज दत्तराजसिंग परदेशी (वय-२४) हा तरुण दि. २० मार्च रोजी शिवाजीनगरात हुडकोत गेला होता. या ठिकाणी एका इमारतीसमोर त्यांने (एम एच १९ डी डब्ल्यू ४१४३) या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुचाकी कुणीतरी जाळल्याचे समोर आले. घटनेत दुचाकी पूर्ण जळून खाक झाली असून ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नीरज परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस नाईक वैशाली पावरा या करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या