Friday, May 17, 2024
Homeधुळेअखेर सहाव्या दिवशी आमरण उपोषणाची सांगता

अखेर सहाव्या दिवशी आमरण उपोषणाची सांगता

दोंडाईचा Dondaicha । श.प्र.

टाकरखेडा (Tankerkheda) येथील ग्रामपंचायतीत विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराची चौकशी (Corruption investigation) करण्यासाठी विविध अर्ज करूनही अधिकार्‍यांनी योग्य ती चौकशी केली नाही. तत्कालीन अप्पर तहसीलदारांनी टाकरखेडा परिसरातील तापी नदीतील बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबतही (Illegal sand mining) विविध तक्रारी करून देखील कारवाई न झाल्याने स्वातंत्र्य दिनापासून सामाजिक कार्यकर्त्या अनिता गिरासे (Social activist Anita Girase) यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. दरम्यान आज शनिवारी सुट्टीचा दिवस असून देखील शिरपूरचे उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer of Shirpur) प्रमोद भामरे यांनी गिरासे यांची भेट घेत उपोषणावर तोडगा काढला. अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे-संघवी यांनी लिंबू सरबत पाजून उपोषण सोडविले.

- Advertisement -

दरम्यान उपोषणादरम्यान तिसर्‍या दिवशी सौ.गिरासे यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात आयसीयू विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधार झाल्याने सौ.गिरासे यांनी पुन्हा दोंडाईचा येथील अप्पर तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले होते.

दरम्यान आज दि.20 रोजी सकाळी दहा वाजता सुटीच्या दिवशी शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे-संघवी, तलाठी संजीव गोसावी यांनी उपोषणकर्त्या सौ.गिरासे यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. चौकशी समिती नेमून इन कॅमेरा चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

तसेच तत्कालीन अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या चौकशीत तथ्य आढळल्याने विभागीय चौकशी सुरू असल्याने नक्कीच योग्य तो न्याय दिला जाईल, असे उपविभागीय अधिकारी श्री.भामरे यांनी आश्वासित केले. त्यांतर अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे-संघवी यांनी सौ. गिरासे यांना लिंबू सरबत पाजून उपोषण सोडविले.

यावेळी माजीमंत्री डॉ.हेमंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे दयाराम कुवर, करणी सेनेचे राजू देशमुख, रामीचे बापू महाजन, पिंटू महाजन, शिवसेनेचे शैलेश सोनार, जेष्ठ पत्रकार जे.पी. गिरासे, सुहास साठे, पंकज चोळके आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या