Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधबोटांच्या ठशावरून कळते विद्यार्थ्यांची हुशारी व आवड

बोटांच्या ठशावरून कळते विद्यार्थ्यांची हुशारी व आवड

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

- Advertisement -

मानवाच्या तळव्यावर व बोटांच्या पहिल्या पेरावर रेषाकृती जे छाप निर्माण होतात, ते आईच्या पोटामध्ये बाळ जेव्हा चार ते पाच महिन्यांचे होते. तेव्हा त्वचा प्राप्त होते व त्वचा प्राप्त होतानाच तळहातावरील व बोटावरील रेषाकृती ठसे आकार घेतात. हे आकार किंवा छाप जन्मभर बदलत नाहीत. हाताला व बोटांना जखम, त्वचारोग इत्यादी मुळे ठशांचे आकार बिघडले तरी जेव्हा त्वचा बरी होते त्यावेळेस हे ठसे आपल्या पहिल्या आकारामध्ये परत दिसून येतात. त्यांच्यात किंचितसुध्दा बदल होत नाहीत. हस्तसामुद्रिकांनी हातावरील फक्त तीनच ठशांचे शंख-चक्र, शुक्ती यांची फलिते दिलेली आहेत. परंतु फिंगर प्रिंटच्या शास्त्रानुसार एकूण मूळ नऊ मुख्य आकार शोधले आहेत. या नऊ आकाराचे विविध लाखो करोडो छाप जगभरामध्ये पाहावयास मिळतात. कारण बोटांवरील व अंगठ्याच्या पहिल्या पेरावरील छाप हा जगातील दुसर्‍या कुठल्याही व्यक्तीशी जुळत नाहीत. त्यात सूक्ष्म का होईना हा फरक असतोच.

मी गेल्या पंचवीस वर्षांपासून फिंगरप्रिंट एक्सपर्ट म्हणून काम पाहत आहे, वादातील अंगठ्याच्या छापावर माझे तज्ज्ञ मत न्यायालये, पोलीस, बँका, संस्था यांना देत असतो. मागच्या पंचवीस वर्षांच्या बोटांच्या ठशांच्या विश्लेषणाच्या अनुभवावरून मला या ठशांबद्दल अधिक सविस्तर मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे असा माझा समज आहे. मी त्यासाठीच आधी नमूद केले आहे, की बोटांच्या छापांचे तीन नव्हे तर नऊ मूळ आकार आहेत व या नऊ मूळ आकारांचे कोट्यवधी विविध छापांचे आकार मानवाच्या बोटावर उपलब्ध आहेत.

लहान मुलांचेही आधारकार्ड बनविले जाते. त्यावर त्यांचा लहानपणाचाच फोटो असतो. मात्र मूल जसे मोठे तरुण होईल अथवा तरुण वृद्ध होईल तेव्हा चेहर्‍यामध्ये बदल हे होणारच आहेत. त्यासाठी तुमची ओळख ही बोटांच्या ठशावरून केली जाणार आहे.

बोटावरील छाप व मेंदूचा अत्यंत जवळचा संबंध आहे – सुमारे 90 वर्षांपासून बोटांवरील छाप व मेंदू यांचा अभ्यास जगभरातील वैज्ञानिक करीत आहेत. त्यांना बोटावरील छाप व मेंदूचा अत्यंत जवळचा संबंध आहे. याची सशोधनाअंती खात्री पटलेली आहे. इतकंच नव्हे तर जगातील वेगवेगळया वैज्ञानिकांनी मेंदूतील कुठल्या भागाचा कुठल्या बोटाशी वा त्याच्या छापाशी संबंध येतो हे सिद्ध केले आहे. मेंदूतून येणार्‍या सर्व संवेदनांचे जोड हातावर आहेत व संवेदनांचे पृथ:करण कसे असेल हे बोटांवरील कायमस्वरूपी असलेले ठसे ठरवितात. म्हणजेच बोटांच्या ठशाावरून संवेदना ओळखता येते. यावरुनच असे लक्षात येते की ठशावरून प्रत्येकाचे अंगभूत कला कौशल्य, बुद्धिमत्ता, कल हे वेगळे आहेत आणि त्यांचे प्रतिनिधीत्व आपल्या बोटांचे छाप करतात. डॉ. प्रो. गार्डनर यांनी 2007 साली, मेंदूचा संंबंध बोटांच्या ठशाशी व त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी त्याच्या अगंभूत कला, कौशल्य बुद्धिमत्तेशी व त्यांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्त्वाशी कसा जुळतो यांचे वैज्ञानिक तत्त्वावर आधारीत संघोधन करून मोठा प्रबंध लिहिला. या सशोंधनाच्या आधारे डीएमआयटी ही संगणक प्रणाली व त्यांचे सॉफ्टवेअर विकसित झालेले आहे. आज आपल्या पूर्वजांनी ज्यांचा अभ्यास केला व जी तत्त्वे सांगितली त्याच आधारावर आज हा शास्त्रीय दृष्टिकोनातून व संघाोधनाअंती मानवाचे मन व व्यक्तिमत्त्व, त्याचे कला-कौशल्य, कोणत्या क्षेत्रात आहे, हे आपण फक्त त्याच्या दहाही बोटांवरच्या रेषांवरून, त्याच्या अंगभूत उपजत प्रवृत्ती कशा आहेत त्याचा पूर्ण डेटा हा लेखी स्वरूपात हा मानवाला उपलब्ध झाला आहे.

जन्मापासून मृत्यूपर्यंत बोटांच्या ठशांच्या आकृत्यांमध्ये जी उपजत हुषारी, प्रवृत्ती, कौशल्य दिले आहे त्यात बदल होत नाही.

शुक्ती छाप विशेषत : अंगठ्यावर शुक्ती असता, एकाच कामात प्रावीण्य मिळवून दिले तर हे लोक ते काम रोबोटसारखे करतात. यांना दिलेल्या कामातील एखादा बदल सहन होत नाही. या मुलांनी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा.

शुक्ती – सिम्पल आर्च – मूलभूत प्रेरणा ही स्वत: व आपल्या कुटुंबाचे संरक्षण व सुरक्षा हे ध्येय असते. यांचे व्यक्तिमत्त्व कार्यात झोकून देणे, विश्वासास पात्र रहाणे, जबाबदारी घेणे व दिलेले काम चोख बजावणे. सिम्पल आर्च हा कामगारांसाठी उत्तम असतो.

ह्री व्यक्ती आपले विचार दुसर्‍याकडे स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही, ती स्वत:ही त्या गोष्टीचे विश्लेषण करू शकत नाही. अशा व्यक्तींना एखाद्या ठरविक काम देऊन त्यामध्ये त्यांना निष्णात बनविता येते. दिलेले काम हे अतिशय इमानेइतबारे करू शकतात. यांचा चरितार्थ चालविण्यासाठी यांना एखादे स्वतंत्र काम देऊन त्यांना त्यामध्ये कौशल्य प्राप्त करुन ते जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात.

विशेषतः अंगठ्यावर शंखाचे चिन्ह असता हे विद्यार्थी, मेहनती असतात. यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या तर ते कोणत्याही क्षेत्रात चमक दाखवितात.

(शंख) लूपच्या व्यक्ती इतरांबरोबर सहजतेने मिसळतात, अशा व्यक्तीच्या कल्पना ठाम असतात. हे 10 पैकी किती बोटांवर व कुठल्या बोटावर आहे त्याप्रमाणे याचा प्रभाव त्या व्यक्तीवर दिसून येतो. या व्यक्ती परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्यात हुशार असतात. अल्नार लूप हे सरासरी सर्वत्र पाहायला मिळते. हस्तसामुद्रिक शास्त्राप्रमाणे गुरू बोटावर सापडणारा आहे. हे बोट धार्मिकता, आध्यात्मिक, न्यायी, चांगले विचार-आचार दर्शविते.

शंख वैशिष्ट्य : सौम्य, निरीक्षण करणारा, वक्तशीरपणा आवडणारा, प्रवाहाच्या विरुद्ध न चालणारा स्वयंप्रेरणेने काम करणारा – विचारी, स्वयंभू, हुशार, चिकित्सक.

विशेषतः अंगठ्यावर चक्राचे चिन्ह असता हे विद्यार्थी अत्यंत बुद्धिमान असतात, बाकीच्या बोटांवर सुद्धा चक्र छाप असेल तर हे लोक अत्यंत बुद्धिमान असतात. हे कुठल्याही शाखेत चमक दाखवितात, यांना जवाबदारी दिली की हे कुठल्याही क्षेत्रात चमक दाखवितात.

चक्र – हा आकार विचार करणारा व न्यायबुद्धीने निर्णय घेणारा असतो. त्यांची मते ही स्वच्छ असतात, स्वत:ची असतात व ठाम असतात. अशा व्यक्ती स्वतःचेच मालक असतात. त्यांना इतरांचे प्रभुत्व सहन होत नाही. जर ते कोणाच्या अधिपत्याखाली काम करीत असतील तर आपले प्रावीण्य दाखविल्याशिवाय राहत नाहीत. यांना स्वत:चे मत प्रदर्शित करायचे असते. तेव्हा दुसर्‍याचे ऐकून त्याप्रमाणेे आपले मत प्रदर्शित करीत नाहीत. या व्यक्तींना इतरांवर प्रभुत्व गाजविणे आवडते व सर्व गोष्टी आपल्या अधिपत्याखाली असाव्यात असे त्यांना वाटते.

बोटावर चक्र – या प्रकारचा छाप कमी प्रमाणात पाहण्यात येतो. हे स्वत: त्यांचे नियम बनवितात व ते स्वत:साठी असतात आणि सामाजिक बंधने या व्य़क्तींना आवडत नाहीत. यांना जे मान्य असते तेच ते करतात. यांच्या मनासारखे असलेले कायदे व नियम ते पाळतात, हातावर जास्त चक्र – असणारी मंडळी समाजाकडून दुर्लक्षित असतात. स्वत: केलेल्या नियमांच्या अधीन राहत असल्यामुळे ते एकटे पडतात. परंतु त्यांच्याकडे एक स्वतंत्र, न सापडणारी हुशारी, बुद्धिमत्ता असते. यामुळे ते आपला ठसा समाजात उमवू शकतात. चक्र – छाप ही स्वतंत्र बाण्याची स्वतंत्र वृत्तीची व आपल्याच कोषात राहणारी परंतु बुद्धिमान व्यक्ती असते.

मोराच्या पिसासारखा आकार – विशेषतः आंगठ्यावर मोराच्या पिसासारखे चिन्ह असतात. हे विद्यार्थी अत्यंत बुद्धिमान, कलाकार असतात. दुसर्‍यावर यांची छाप पडते. यांना सामाजिक, राजकीय, क्षेत्रात भाग घेऊन पुढारीपण करायला आवडते व त्यात ते नाव कमावतात.

हा प्रकार चक्र छाप प्रकारासारखा असला तरीही तो मोराच्या पिसासारखा दिसणार्‍या आकृतीप्रमाणे असतो. याच्या मध्यभागी चक्र (छाप) व त्याचा एक भाग (शंख) चक्र छापापेक्षा त्यांचे गुण सौम्य असतात. ग्रहणशक्ती जास्त असते.

क्वचित हातावर येणारे हे चिन्ह आपले वेगळेपण दर्शविते. तसेच या व्यक्तीमधील गुणही वेगळे असतात. वैशिष्ट्य – कलाकार, नेतृत्व गुण, दिखाऊपणा व मोठी आकलन शक्ती.

- Advertisment -

ताज्या बातम्या